औसा नगर परिषदेकडून प्रधान मंत्री आवास योजनेखाली ४२१ लाभार्थ्याची निधीचे हप्ते मागील २ महिन्यापासुन अडवून ठेवले बाबत तसेच बांधकाम परवाना शुल्क मध्ये सवलत दया

 औसा नगर परिषदेकडून प्रधान मंत्री आवास योजनेखाली ४२१ लाभार्थ्याची निधीचे हप्ते मागील २ महिन्यापासुन अडवून ठेवले बाबत तसेच बांधकाम परवाना शुल्क मध्ये सवलत दया







औसा (रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो )

या बाबत सविस्तर वृत असे की औसा शहरातील नगर परिषदेच्या वतीने ३ या डिपीआर मध्ये एकुण ४२१ लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधान मंत्री आवास योजनेखाली मंजुरी मिळाली असून सदरील लाभार्थ्याचे पहिला हप्ता प्रत्येकी १ लाख रु. असे एकूण ३.९२ कोटी रु. न.प. च्या खात्यावर शासनाकडून २ महिन्यापूर्वी जमा करण्यात आलेले आहे. २ महिन्याचा कालावधीत होऊनसुध्दा औसा नगर परिषद कडून या गोरगरीब ४२१ लाभाथ्र्यांना निधीचा पहिला हप्ता नगर परिषद कडून देण्यास टाळाटाळ होत आहे

सद्या बांधकाम साहित्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या तुटपुंज्या निधीतून लाभार्थ्याना घर बांधकाम करण्यास अडचणीचे होणार आहे. निधी असताना औसा नगर परिषद लाभार्थ्यांना निधी देत नाही ही गंभीर बाब आहे.

जिलाधिकारी लातूर यांनी आपल्या स्तरावर औसा नगर परिषदेला आदेशीत करावे व त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावी. ही विनंती. तसेच औसा नगर परिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थ्याकडून अकारण्यात येणारा बांधकाम परवाना शुल्कामध्ये सहलिन देण्यात यावी अशी मागणी विलास राव देमुख युवामंच च्या वतीने मुल्ला खुंदमिर

चवन आबा बनसोडे 

नियामत लोहारे

पुरुषोत्तम नलगे 

गणेश कसबे 

हाजी शेख 

श्री. भागवत पांडूरंग म्हेत्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या