स्थानिक गुन्हे शाखा,लातूर ची कारवाई. मंदिरा मधील दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक.10,000/- रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत.*

 

            


            


        *स्थानिक गुन्हे शाखा,लातूर ची कारवाई. मंदिरा  मधील दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक.10,000/- रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत.*



लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.



             सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरी प्रकरणातील संशयित आरोपी बार्शीरोड लगत इदगाह मैदानाच्या परिसरातील एका कोपऱ्यात बसलेले आहेत.अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने ईदगाह परिसरातील गोपनीय माहिती मध्ये मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता पोलिसांची चाहूल लागताच संशयित इसमा पैकी एक इसम भिंतीवरून उडी मारून पळून गेला. दुसऱ्या इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव

गणेश श्रीकांत साळुंखे, वय 22 वर्ष, राहणार कैलास नगर, लातूर. 

असे असल्याचे सांगितले.



                 पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की,साई मंदिरातील दोन दानपेटी फोडून त्यामधील काही रक्कम आपले जवळ ठेवून उर्वरित रक्कम एका बॅगमध्ये ठेवून सदरची बॅग आत्ताच पळून गेलेला त्याचा मित्र विनायक भाऊसाहेब पवार, राहणार भामरी चौक, नांदगाव रोड, रेल्वेपटरीच्या शेजारी, लातूर यांच्याकडे दिली होती असे सांगितले.व सदरच्या चोरी मधील चोरलेली रकमेपैकी नमूद आरोपी ने स्वतःजवळ ठेवलेली दहा हजार रुपये काढून दिल्याने ती रक्कम गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. 


          नमूद आरोपीस पोलीस ठाणे एमआयडीसी येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 769/2021 कलम 457,380 भा.द.वि मध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस  करीत आहेत. तसेच पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू असून फरार आरोपीस अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .


             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय भोसले,पोलीस अंमलदार- सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, नाना भोंग,चालक कांबळे यांनी बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या