शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठ,* *सद्राक्षणाय खलनिग्रहणाय*

 *शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठ,*

*सद्राक्षणाय खलनिग्रहणाय*











लातूर रिपोर्टर न्यूज़ 

               रात्रगस्त दरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थागुशा,लातूर येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज रोजी दुःखद निधन झाले.


              पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अहमदखान पठाण यांना शोक सलामी देण्यात आली.

                यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख व पोलीस अमलदार उपस्थित होते.

 

#लातूर_पोलीस खान कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या