राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाचा वाहनधारकांना त्रास... >>> रत्नागिरी - नागपूर रोड महामार्गाच्या कामांत गंगामाई कंस्ट्रक्शनचा जीव घेण्याचा खेळ सुरूच..

 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाचा वाहनधारकांना त्रास... 

>>> रत्नागिरी - नागपूर रोड महामार्गाच्या कामांत गंगामाई कंस्ट्रक्शनचा जीव घेण्याचा खेळ सुरूच..

*** रस्त्याची प्रचंड दुरावस्था ; रस्ता रुंदीकरणाच्या नावाने दोन्ही बाजूला खोदकाम, निकृष्ट दर्जाचे काम, वाहनधारकांना धुळीचा त्रास..









एस ए काझी 


औसा प्रतिनिधी / - रत्नागिरी - नागपूर हायवे क्र. ३६१ लातूर ते औसा स्त्यावर होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एमएसआरडी चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औसा ते लातूर सुरु असलेले रस्त्याचे काम चांगला पर्यायी मार्ग गंगामाई कंत्राटदाराने न दिल्याने दररोज अपघात होऊन प्राणहाणी होत आहे.

या कामात गैरप्रकार होत असून, उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच कामाचा दर्जा सुधारावे ही मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. लातूर - औसा रोड महामार्गाच्या गंगामाई कॉन्ट्रॅक्टरनी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने दोन्ही बाजूला खोदकाम करून रस्ता अरुंद केला आहे. त्यामुळे महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने खड्डे चुकविताना वाहन पलटी होणे, समोरासमोर धडक बसणे, खड्ड्यात वाहन अडकून बंद पडणे आदी कारणाने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून औसा ते लातूर रस्त्याचे काम सुरू आहे यामुळे वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध नाही. वाहनधारकांना कच्च्या एकेरी रस्त्यावरूनच  जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. यात अनेकांना जीव गमवावे लागले असतानाही, रस्त्याच्या कामाला गती मिळत नाही. आणखी किती लोकांचा जीव गेल्यानंतर काम पूर्ण होणार असा संतप्त सवाल वाहनधारकांतून केला जात आहे. लातूर -औसा महामार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करणे आवश्यक होते. मात्र पर्यायी मार्गाचा कसलाही विचार न करता एकेरी वाहतूक मार्गाने चालू आहे. औसा-लातूर या मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या एका बाजूला काम सुरु असल्याने दुसऱ्या बाजुने रस्ता खुप खराब झाला आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने दररोज अपघात होत आहेत. वास्तविक पाहता कोणत्याही रहदारीच्या रस्त्याचे काम करीत असतांना पर्यायी चांगला रस्ता देणे ही काम करीत असलेल्या कंत्राटदाराची जबाबदारी असते. मात्र संबंधीत कत्राटदाराने याला पूर्ण बगल दिली असुन रस्त्यावरच्या या खड्याने आनेक अपघात घडले असुन अपघाताची ही मालीका सुरुच आहे. महामार्गवर गेल्या आनेक दिवसांपासुन मोठ, मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पडलेल्या या खड्ड्यांनी पादचाऱ्यासह वाहन चालकांना मोठा त्रास सहण करावा लागत असतांनाही या खड्ड्यात साधे मुरुम टाकुन बुजून घेण्याची तसदी गंगामाई कंस्ट्रक्शनचा आली नसून 

महामार्ग चौपदरीकरणाच्या नव्याने होत असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असून, या रस्त्याचाही वापर करण्यापूर्वीच दयनीय अवस्था झाली आहे.खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीवरील अनेकजण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होवून अनेकांचे बळी देखील गेला आहे. तर कित्येकजण जायबंदी झाले आहेत. महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंंनी मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहतुक कोंडी होत आहे. खड्ड्यांनी माखलेल्या या रस्त्यावरुन दुचाकीस्वाराला जाणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे आहे. आनेक दुचाकीस्वाराला या खड्यांमुळे आपला जिव गमवावा लागला आहे. रस्ते बांधणी करतांना रस्ता होईपर्यंत पर्यायी चांगला मार्ग तयार करुण देणे ही संबंधीत कंत्राटदाराची जबाबदारी असतांना रस्ता वळविण्यात धन्यता मानण्यात आली आहे. औसा - लातूर मार्गावर या जबाबदारीला केराची टोपली दाखविल्याचे दिसुन येते.

एका बाजूचे काम सुरू असताना वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची वाट लागल्यानंतर ही खड्डे बुजविण्याची तसदी गंगामाईच्या ठेकेदाराने घेतली नाही. या महामार्गावर मोटार सायकल चालवणे कठीण झाले आहे चार चाकी व इतर वाहनांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. "खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डे" म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. 

कधी पावसाचे खड्ड्यात पाणी साचून वाहनचालकांच्या खड्डा लक्षात न आल्याने आनेक अपघात घडत आहेत. मात्र ज्यांच्यावर या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी याकडे साफ डोळेझाक केल्याने वाहनधारक, नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान पर्यायी मार्गासाठी जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून हे जुने पूल वाहतुकीसाठी खुले केले असले, तरी या ठिकाणचा बाजुचा भराव घालून निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. 

हा सर्व प्रकार उघड दिसत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डोळेझाक करीत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. 

 येथील चौपदरीकरणाचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, याचे बघताक्षणी दर्शन घडत असले, तरी याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार, तालुक्यातील दोन्ही आमदार, खासदार यांच्यासह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष करीत आहेत.

आज पर्यंत  नऊ लोकांचे बळी.. 

 वाहन धारक प्रवाशांचे काही झाले तरी देणेघेणे नाही याच मानसिकतेतून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली  वाहनांची वर्दळ सुरू असतानाच कामाला सुरुवात झाली रस्ते वाहतूक कोंडीने आज पर्यंत  नऊ लोकांचे बळी गेले आहेत सातत्याने अपघात होत असताना या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत प्रचंड धुळीमुळे समोरचे वाहन ही दिसत नाही धूळ खाली बसविण्यासाठी पाणी मारले जात नाही खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना हाडाचे मणक्याचे आजार उद्भवत आहेत धुळे ने शासनाच्या विश्वास नाच्या श्वास नाच्या आजारात ही वाढ झाली आहे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत असताना रस्त्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे  लातूर ते औसा पर्यंत रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे  एक बाजू पूर्ण होण्यासाठी आणखीन किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे गंगामाई ठेकेदाराचा वाहन धारकाच्या जीवाशी खेळ सुरू आहे तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची भूमिका घेत आहे त्यांनाही लोकांच्या जीविताचे काही सोयर सुतक नाही. रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत पर्यायी मार्ग तयार करून त्यावरून वाहतूक वळविण्यात यावी अशी मागणी वाहनधारक आतून होत आहे. 

अधिकारी, लोकप्रतिनिधींची डोळेझाक.. 

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे हा रस्ता म्हणजे अधिकारी, ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे. शासनाकडून रस्त्यावर कोट्यवधी रुपयाचा चुराडा होत असताना वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करताना कामाचा दर्जा, गुणवत्ता, क्षमता यासाठी लागणारे साहित्य कोणते, किती प्रमाणात वापरायचे ? याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

पालकमंत्र्यांच्या सुचनेलाही केराची टोपली....

परवाच लातूर येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी औसा-लातूर रस्त्याच्या दुर्दशेबाबत लक्ष वेधुन पर्यायी रस्ता चांगला करुन देण्याच्या सुचना संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र तीन दिवस उजाडले तरीही यावर कोणतीही कारवाई न झाल्याने या रस्त्याच्या कंत्राटदाराने आणि यावर नियंत्रण असलेल्या संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेला केराची टोपली दाखविल्याची चर्चा सुरु आहे.

औसा-लातूर रस्ता दुरुस्तीसाठी छावा आक्रमक ;दोन दिवसात चांगला पर्यायी मार्ग नाही दिला तर काम बंदचा ईशारा. 

 

हे सगळे होतांनाही हे काम करीत असलेल्या कंत्राटदारांकडून उडवा उडवीची आणि बेफिकीरीची उत्तेर मिळत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेने तहसीलदारांना एक निवेदन देत जर दोन दिवसात पर्यायी मार्गावरील खड्डे बुजून रस्ता चांगला केला नाही तर हे सुरु असलेले काम बंद कऱण्याचा ईशारा दिला आहे. आनेकांनी या रस्त्या बाबत तक्रारी केल्या तरीही संबंधीत कंत्राटदाराला घाम फुटत नसल्याने आता छावा संघटना मैदानात उतरली असुन संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देत या रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष देऊन संबंधीत कंत्राटदाराला पर्यायी रस्त्यावरील खड्डे बुजवून देण्याची सुचना करण्याची विनंती केली आहे. या उपरही जर दोन दिवसात हे खड्डे न बुजवता काम सुरु राहीले तर छावा संघटना हे काम पर्यायी चांगला मार्ग होत नाही तो पर्यंत बंद पाडेल असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या