जि.प.प्रशाला लामजनाच्या माजी विध्यार्थीच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख रसूलसाब महेताबसाब व सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संपन्न.
औसा [प्रतिनिधी ]विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरतात तेच गुरु,दिशा दाखवतात तेच खरे गुरु.आपल्या स्नेहाच्या सावलीत मिळालेल्या ज्ञानामुळे,संस्कारामुळे आम्ही आज आत्मनिर्भर झालो आहोत.आमचे समाजात चांगले स्थान निर्माण झाले आहे.जीवनात प्रत्येक क्षणी आपली आठवण येत असते.आपल्या ऋणाची उतराई शक्य नाही,हे खरे आहे; परंतु आपणाशी भेटावे,दोन गोष्टी बोलाव्यात या उद्देशाने गुरुवंदना व स्नेहमेळावा तथा हृदय सत्कार लामजना जि.प.शाळा शैक्षणिक वर्ष 2004 सालच्या दहावी बॅचच्या विध्यार्थ्यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा लामजना दि. 6नोव्हेंबर ,वार - शनिवार रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बालाजी पाटील,उपसरपंच- ग्रामपंचायत लामजना तसेच प्रमुख अतिथी श्री रामप्रसाद धोंडीराम बजाज (माजी सरपंच),श्री. प्रा. सुरेन्द्र रावसाहेब पाटील,प्रसिद्ध कथा-कादंबरीकार,लामजना,प्रा. डाॅ.नंदकुमार माने, प्रसिद्ध समीक्षक,लामजना व सत्कारमूर्ती मध्ये श्री. विनायक दत्तात्रय वाघोलीकर सर,श्री. वसंत सीताराम टेंकाळे सर,सदाफुले लक्ष्मण मसाजी सर,सौ. प्रभावती विनायक वाघोलीकर मॅडम,श्री. रसूल मेहताब साहेब शेख सर,श्री. चंद्रकांत यशवंत कोळसुरे सर,श्री. किरण विठ्ठलराव पाटील सर,श्री. प्रल्हाद बापूराव गिरी सर,श्री. देवानंद अंगद कोंडणगिरे सर,श्री. सुभाष चंद्रशेखर नंदरगे सर,श्री. सुभाष निळकंठय्या स्वामी सर,श्री. सुनील मनोहर सोनवणे सर,श्री. शेषेराव नारायण शिंदे सर,श्री. धनराज निजगुणाप्पा आळंगे सर,श्री.रणजितसिंह हणमंतसिह राठोर,श्री. लक्ष्मण लांडगेमामा सर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.