किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्याला दिले निवेदन

 किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्याला दिले निवेदन










औसा प्रतिनिधी विलास तपासे 

औसा तालुक्यातील किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषद यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख यांना ई मेल करुन त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. मराठवाड्यातील किल्लारी सह. साखर कारखाना हा लातूर /उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा, निलंगा, उमरगा,लोहारा या चार तालुक्यातील शेतकरी सभासद असणारा आहे. हा संपूर्ण भाग संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो.

      लातूर जिल्ह्यातील हा सर्वात जुना कारखाना असून असंख्य शेतकर्‍यासह ऊसतोड मजूर, कामगार यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचे सामर्थ्य या कारखान्यात दडलेले आहे. या कारखान्याने आतापर्यंत संसदेत व विधानसभेत अनेक आमदार खासदार निर्माण करून स्थानिक नेतृत्व तयार केलेले आहे. व राजकारण समाजकारण व अर्थकारण साधण्याचे व्यासपीठ म्हणून काम केलेले आहे. मागे १९९३ च्या भुकेपानंतर मा शरदचंद्रजी पवार याने सरकारच्या माध्यमातून हा कारखाना सुरू व्हावा व पुनर्जीवित व्हावा यासाठी आर्थिक पॅकेज दिलेले होते व शेतकर्‍यांच्या हक्काच्या कारखान्याकडे सकारात्मक दृष्टिकडे बघून सुरूही केला होता. मात्र मागील सात वर्षापासुन हा कारखाना राजकीय डावपेच आखुन येथील जा स्त रिकवरी चा ऊस आपल्या कारखान्याला मिळवा म्हणनून बंद पाडला व कारखाना अवसायानात काढुन भेगार मध्ये विक्री करून गिळकृत करण्याचा डाव आखला होना मात्र कारखाना बचाव समीतीने आंदोलन करून कारवाना वाचवला नंतर पृथम  खासदार सुभाष देशमुख याने भाडेतत्वावर घेऊन एकवर्ष चालवुन बंद केला मात्र विधानसभा निवडनुकीत आमदार ब स्वराज पाटील याने कारखाना चालविण्याचे वचन देऊन निवडुन आले व 3वर्ष कारवाना चालवुन 38 कोटी कर्ज फेडले कारखाना कर्ज मुक्त केला मात्र पून्हा भाजपाची सता आली व राजकारण झाले भाजपाचे अवसायक नेमले पण त्यांची सत्ता आसुनही त्यानी कारखाना त्यानी बंद ठेवला आशा अत्यंत अडचणीत असून पूर्णपणे बंद आहे. मध्यंतरी भाजप सरकारने हा कारखाना सुरू करण्यासाठी फक्त घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात खऱ्या ठरल्या नाहीत पर्यायाने इथला शेतकरी आपल्या हक्काच्या कारखान्यापासून वंचित राहिला. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पाहताना आज उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झालेला असून या भागातील प्रकल्प, बंधारे, बॅरेजेस तुडुंब भरलेले असून पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. त्यामुळे या भागात आज उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. व नगदी पीक आणि खात्रीशीर पीक म्हणून शेतकर्‍यांची भावना झालेली आहे. ऊस कुठे कोणत्या कारखान्याला द्यावा, आपला ऊस कारखान्याला जाईल का नाही. हा प्रश्ण शेतकर्‍यांना भेडसावत आहे. यामुळे किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी जोर धरीत आहे. 

   या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, बहुजन रयत परिषदेचे महासचिव राजीव कसबे, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, निराधार संघर्ष समितीचे संयोजक दगडू बरडे, शेतकर्‍यांची पोरं संघटनेचे संस्थापक अजिंक्य शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन ढवण, सामाजिक कार्यकर्ते नारायण आबा नरखेडकर, बालाजी जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालय मुंबई, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री, महाराष्ट्र राज्य, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य याना ई मेल द्वारे त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या