आत्महत्या करणाऱ्या युवतीचे वाचविले प्राण....रात्रगस्त वरील चार्ली पोलीस पेट्रोलिंग अमलदारांची कर्तव्यतत्परता

आत्महत्या करणाऱ्या युवतीचे वाचविले प्राण....रात्रगस्त वरील चार्ली  पोलीस पेट्रोलिंग अमलदारांची कर्तव्यतत्परता...* 








लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

         याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर पोलिसाकडून लातूरकरांना तात्काळ पोलिस मदत मिळावी याकरिता लातूर शहरात रात्र व दिवस असे 24 तासा करिता दोन शिफ्टमध्ये 10 मोटारसायकल व त्यावर 20 सशस्त्र पोलीस अमलदारांची नेमणूक करण्यात आली असून सदरच्या दहा मोटारसायकलीना  "चार्ली"  असे कॉल साईन वापरण्यात येते.

            दिनांक 18  ते 19 च्या मध्यरात्री वरील चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंग पैकी चार्ली क्रमांक 07 हे बाभळगाव, रिंगरोड परिसरात रात्रगस्तीवर होते. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास चार्ली क्रमांक 07 चे पोलीस अंमलदार  महबूब शेख यांना माहिती मिळाली की, एक युवती अनवाणी पायाने, रडत कव्वा येथील तलावाकडे पळत गेलेली आहे. त्यावरून चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार मेहबूब शेख,बक्कल नंबर 474 व विनोद  हेंबाडे बक्कल नंबर 707 यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन सदरची माहिती वायरलेस द्वारे वरिष्ठांना कळविली व तात्काळ कव्वा परिसरातील तलावाकडे रवाना झाले.




              तलाव परिसरात पोहोचून नमूद युवतीचा शोध घेतला असता सदरची युवती ही तलावाच्या कडेवर थांबलेली दिसली. लगेच नमूद चार्ली पोलिसांनी त्या युवतीस पाठीमागून जाऊन धरले व तिला तलावापासून दूर आणले. त्यानंतर त्या युवतीस विश्वासात घेऊन बोलते केले असता त्याने 'कौटुंबिक कलहातून नैराश्य आल्याने तलावात उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.' चार्ली पोलिसांनी त्याचे नाव,पत्ता विचारून त्या युवतीस तिचे घरी सुखरूप परत आणून आई- वडिलांच्या ताब्यात दिले.

              चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार महबूब शेख व विजय हेंबाडे यांनी मिळालेल्या माहितीवर कर्तव्य तत्परता व समय-सूचकता दाखवत नैराश्यग्रस्त व आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवतीस आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करून त्याचे प्राण वाचविले.

               चार्ली क्रमांक 07 चे पोलीस अंमलदार महबूब शेख व विजय हेंबाडे यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे वरिष्ठा कडून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या