मास्टरदीप शैक्षणिक संस्थेकडून पोलीस हवालदार इकबाल शेख यांना विशिष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार प्रदान.*

 *मास्टरदीप शैक्षणिक संस्थेकडून पोलीस हवालदार इकबाल शेख यांना विशिष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार प्रदान.*


दिनांक 31/10/2021 अकलूज







कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल अकलूज येथे पार पडलेल्या "The Made Man Award 2021" कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंह शंकरराव मोहिते पाटील चेअरमन, कु. रिंकू राजगुरू सिनेअभिनेत्री (सैराट फेम आर्ची), कु. आर्या घारे सिने अभिनेत्री, श्री. दीपककुमार बोडरे संस्थापक मास्टरदीप शैक्षणिक संस्था व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सदर चे कार्यक्रम पार पडले आहे.


*पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन मास्टरदीप शैक्षणिक व संशोधन संस्था अकलूज यांचे वतीने "The Made Man Award 2021" "विशेष प्रशासकीय सेवा पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आलेले आहे.*

कोन आहेत 

पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख

सोलापूर ग्रामीण.


सन 2003 साली कोल्हापूर पोलिस दलात भरती होऊन 2008 पर्यंत कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत होते. 2008 ते आजतागायत सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांनी आजतागायत विविध स्पर्धेतून सहभाग घेऊन १० सुवर्ण, ७ रौप्य व ११ कांस्य पदके पटकाविली आहेत. सन 2018 साली महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळावा मध्ये सुवर्णपदकासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून सन्मान करण्यात आला. सन 2019 मध्ये लखनऊ उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा मध्ये सुवर्णपदकासह भारत देशात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र पोलीस संघाने 62 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे त्याबद्दल श्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचेकडून सन्मानित करण्यात आले. सन 2020 मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नवी दिल्ली यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाकडून सहभाग घेऊन राष्ट्रीय पारितोषिक पटकावले आहे त्याबद्दल श्री जे किशन रेड्डी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार व श्री अजय कुमार भल्ला केंद्रीय गृह मुख्य सचिव भारत सरकार यांचेकडून सन्मानित करण्यात आले. तसेच सण 20 21 मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सीसीटीएनएस हैकथाॅन ऍड सायबर चॅलेंजेस या स्पर्धेत सहभाग घेऊन भारत देशातून पहिल्या दहा क्रमांकाच्या स्पर्धकांमध्ये निवड करण्यात आली त्याबद्दल श्री अतुल चंद्र कुलकर्णी अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन्मानित करण्यात आले. तसेच 01 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात सन्मानाचे मानले जाणारे पोलिस महासंचालक पदक तत्कालीन पोलिस महासंचालक श्री हेमंत नगराळे यांचेकडून प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील विविध सामाजिक संस्थांकडून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या