प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने बालकांना दिवाळी निमित्त कपडे वाटप .

 प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने बालकांना दिवाळी निमित्त कपडे  वाटप 

   दी.१.११.२०२१ रोजी नाना नानी उद्यान  (पार्क) परिसरात गरजूवंत  बालकांना  दिवाळीचे औचित्य साधून लहान बालकांना कपडे  वाटप करण्यात आले.








  गेली दोन वर्षां कोरोनामुळे जनतेचे  आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे त्यात पावसानेही शेतकऱ्यांना सुद्धा सोडलेले नाही त्यामुळे पिकांचे नुकसान दिवाळी सणात पैसा   नसल्याने अडचणीत सापडलेल्या वंचित व गरजूवंतांना  अनेक अडचणीतुन जावे लागत आहे आश्या वेळी सर्वत्र समाज आज आनंदाने दिवाळी सण  साजरा करत असताना एकीकडे हाताला काम  नसल्याने त्यांचे दिवाळी कोरडीच साजरी करण्याची वेळ आली अश्या अडचणीत सापडलेल्या परिवारातील बालकांना  प्रभुराज प्रतिष्ठाण पुढाकाराने  यांना ही दिवाळी सण सुखाचे व त्यांच्या चेहरावरील हाश्य हे पाहण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठानने एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासन्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद देत उपस्थित लोकांनी  प्रतिष्ठानने केलेल्या  उपक्रमाची कौतुक  करत प्रत्येक समाजांनी असे उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य करावे असे उपस्थितांनी मत मांडले.

  बालकांच्या  चेहरावरील हासू यातच खरे समाधान 

  यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,शिवाप्पा धुळे,मनोज पोपडे,मशाक साहेब,बंडप्पा जवळे,हुसेन शेख,समाजसेवक संतोष जमदाडे,मुन्ना बट्टेवार,मुन्ना टेंकाळे,लक्षीमन दरगु, विशाल शिंदे,सोमनाथ खुदासे,सुभाष माशाळकर, संतोष वडवले, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी,,मोतीराम कदम,पारस चापसी,मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर,आदी व महिला मोठया संख्येने  उपस्थित होते. आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या