हासेगाव फार्मसित- युवा उमंग 2021

 हासेगाव फार्मसित- युवा उमंग 2021


       






    औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेंगाव महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या  निरोप घेण्यात आला

          विध्यार्थी जीवनात यश संपादन करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचाराची गरज  पाहिजे सकारात्मक विचारांमुळे च तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुध्दा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही, तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. आणि आपले धैय पूर्ण करण्यास यशस्वी होतो असे मोलाचे मार्गदर्शन म.न. पा . महापौर श्री विक्रम गोजमगुंडे यांनी विध्यार्थ्यांना दिले   

          या प्रसंगी सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात आला

   या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील म.न.पा. महापौर   श्री. विक्रांत गोजमगुंडे, सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद माजी सहसंचालक डॉ अजित थेटे,  व्यवस्थापन परिषद सदस्य स्वा.रा. ती.म.विद्यापीठ नांदेड मा. प्रा. डॉ.रमाकांतजी घाडगे , राष्ट्रीय लिंगायत समन्वय अविनाश भोसिकर,नगर सेवक अजय कोकाटे,प्रा.राजेश विभुते, सुनिल हिंगणे, अध्यक्ष भिमाशंकर बावगे, सचिव वेताळेशवर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ शामलिला बावगे (जेवळे) अन्य मान्यवर उपस्थित होते .

         

           त्याच बरोबर  प्रास्तविक पर भाषण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे यांनी केले तर संस्थेबद्दल सविस्तर माहिती संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे यांनी दिली

       

        तसेच सद्याच्या  करोनाच नाही तर येणाऱ्या काळात कोणताही जीवघेणारा विषाणू , रोग असो त्यावर कशा व कोणत्या प्रकारे मात करता येईल व कोणत्या प्रकारचे लस व औषध निर्माण करता येईल यावर सळोत अभ्यास व शोध करावा व ते निर्माण करून दाखवावे तसेच अनेक नवनवीन प्रयोग करावे असे मोलाचे मार्गदर्शन प्रा. राजेश विभुते यांनी केले . 

               त्याच बरोबर सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालाय औरंगाबाद  माजी सहसंचालक डॉ अजित थेटे यांनी ही संस्था एक रोपटं होते पण आज त्या रोपठ्याचे वटवृक्ष आज पाहतोय तसेच सर्वांगीण विकासासाठी मेहनत गरजेची असून विध्यार्थ्यानी जीवनात कितीही एन्जॉय केलात तरी अपार मेहनत केल्याशिवाय यश संपादन होत नाही असे मोलाचे मार्गदर्शन केले.

               २५ सप्टेंबर रोजी जागतिक औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्य महाविद्यालयात एकदिवशीय  पोस्टर सादरीकरनाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्य प्रथम  आणि द्वितीय येणारे रावेसे ज्ञानेश्वर भास्कर थेटे , पुर्वा पुष्कर आणि आरती तिडके तर पायल जाधव आणि अंजली मस्के या  विध्यर्थ्याना ५००० व  ३००० रुपये धनादेश  ,  प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्न देऊन गौरवण्यात आले  

     याच बरोबर   मिस्टर फ्रेशर आणि मिसेस  फ्रेशर म्हणून पांचाळ शुभम आणि   अनुष्का कांबळे तर डी  फार्मसी मधून कदम वैष्णवी आणि देवकांबळे अनिल यांची निवड करण्यात आली .  

           श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे  चे अध्यक्ष भिमाशंकर बावगे, संस्थे च्या उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे, सचिव  श्री वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे  प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी इन्सटीट्युट ऑफ पोलिटेक्निक, हासेगाव च्या प्राचार्या सौ योगिता बावगे, ज्ञानसागर विद्यालयाचे  मुख्याध्यापक कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक रत्नदीप सूर्यवंशी आणि  लातूर सायन्स कॉलेज चे श्री अनंत लांडगे , लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्राचार्य सतीश गायकवाड श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ई. उपस्तीथ होते.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कल्चरर इन्चार्ज  प्रा. खवले बालाजी यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या