श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव च्या वतीने 10 हिरकणीचा प्रोत्साहन पुरस्कार

 श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव च्या वतीने 10 हिरकणीचा प्रोत्साहन पुरस्कार .        






    

        औसा (प्रतिनिधी )प्रसिद्ध व्याख्यात  प्रसुती तज्ञ डॉ संध्या वारद या गेली २५ वर्ष त्यांच्या क्षेत्रात  कार्यरत आहेत  ,बोमणे  पूजाताई या संगम नर्सरीच्या संचालिका आहेत गेली १० वर्षांपासून नर्सरी चालवत आहेत पण करोना मुळे त्यांच्या पतीची साथ सुटली तरी पण ते न खचता ताईंनी आपल्या जोडीदाराचा व्यवसाय पुढे चालविण्याचा निर्णय घेतला . त्याच बरोबर सुवर्णा  बुरांडे या गेल्या १४ वर्षांपासून त्या सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांची स्वतःची सौंदर्य प्रसाधन कार्यशाळा आहे तसेच  राजमाने ताई जे के जोशी रात्र वाणिज्य महाविद्यालय लातूर हिंदी विभागात कार्यरत आहेत ज्ञान प्रकाश प्रतिष्ठान च्या ज्ञान प्रकाश बालविकास केंद्र प्रकल्पात गेली १० वर्षांपासून सक्रिय कार्यरत आहेत .   रेणुका भालचंद्र खिचडे हे शांती निकेतन सी.बी एस. सी शाळेच्या संस्थापक म्हणून गेली काही वर्षांपासून कार्यरत आहेत. सौ. जयदेवी भीमाशंकर बावगे  यांचे  शिक्षण क्षेत्रात  संस्था स्थापन झाल्यापासून खूप मोठे योगदान आहे त्यानंतर सौ नयन भादुले ,  शिवकन्या पुष्कर - जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका आहेत,  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव च्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे, नयन राजमाने हे नारी प्रोबोधन मंच ,  कपिलधारेश्वर प्रतिष्ठान शब्दकीत साहित्य मंच इत्यादी सामाजिक क्षेत्रात कार्यरत  राहत त्यांनी अनेक  संस्था अंतर्गत कार्य केले आहेत अशा  महिलांना त्यांच्या  सामाजिक कार्या बद्दल  अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती व श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव  संयुक्त स्त्री प्रोत्साहन पुरस्कार प्रधान करून  सन्मानित करण्यात आले .

         या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील म.न.पा. महापौर   श्री. विक्रांत गोजमगुंडे,राष्ट्रीय लिंगायत समन्वय अविनाश भोसिकर, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे, संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे ,  कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,प्रा.राजेश विभुते गोविंद नगरचे तिरुमले महाराज ,नगर सेवक अजय कोकाटे ,व्यवस्थापन परिषद सदस्य स्वा.रा. ती.म.विद्यापीठ नांदेड मा. प्रा. डॉ.रमाकांतजी घाडगे , गुलाब दानाई, रंगुनाथ पाटील हासेंगावचे उपसरपंच सलीम शेख आणि अन्य मान्यवर मंच्यावर  उपस्थित होते .          .        संस्थेचे  कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी प्रास्थाविक  पर भाषणात आज या संस्थेतील प्रत्येक विध्यार्थी हा सर्वगुण संपन्न झाला पाहिजे त्यासाठी महाविद्यालयात अनुभवी शिक्षक वृंद नवनवीन टेकनॉलॉजि चा   विध्यार्थ्यानी   उपयोग   करून  घेतला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले .              

       राष्ट्रीय लिंगायत समन्वय अविनाश भोसिकर  यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करत असताना स्त्री शक्ती  काय असते आणि स्त्री काय करू शकते हे सांगून या स्त्रियांचा आदर्श  आपण सर्वानी घेतला पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त केले .     

             त्याच बरोबर   लातूर येथील म.न.पा. महापौर   श्री. विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष यशस्वी पुरुषामागे स्त्री चा हात असतो परंतु या संस्थेत यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात आहे त्याच बरोबर कोणत्याही क्षेत्रांतला विध्यार्थी असो त्याला ज्ञाना सोबत बोलण्याचे कौशल्य असलं पाहिजे  असे आपले मनोगत व्यक्त केले .                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या