पोलीस ठाणे औसा हद्दीतील येळी गावातील उसाच्या शेतातील गांजा लागवडीवर कार्यवाही. 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त.*

  *पोलीस ठाणे औसा हद्दीतील येळी गावातील उसाच्या शेतातील गांजा लागवडीवर कार्यवाही. 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त.*







     लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो

 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे,अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित केले होते.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान औसा येथे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी औसा पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे येळी तालुका औसा शिवारात इसम नामे नारायण संतराम साठे, राहणार येळी तालुका औसा . याने त्याचे मालकीचे ऊसाचे शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची झाडाची लागवड केली आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

               पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचे नेतृत्वात पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनेच्या ठिकाणी मौजे येळी येथील इसम नामे नारायण संतराम साठे याचे ऊसाचे शेतामध्ये जाऊन छापा मारला.त्याचे उसाच्या शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची पंधरा झाडे लावलेली मिळून आली. सदर गांजाचे झाडांची घटनास्थळीच दोन शासकीय पंचांसमक्ष पंचनामा करून वजन केले असता त्याचे वजन 18 किलो व किंमत अंदाजे 1,26,000/- रु. इतकी असून सदरचा मुद्देमाल हा ताब्यात घेतला आहे.यातील आरोपी नामे नारायण साठे यास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

              सदर ची कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी,पोलीस उपनिरीक्षक घोरपडे,सफौ रामराव चव्हाण,पोलीस अमलदार मुक्तार शेख, सुर्यवंशी, दंतुरे,महेश मर्डे,समीर शेख, भारत भुरे,डांगे,भागवत,गोमारे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या