जगण्याची कसरत*

 *जगण्याची कसरत*



जगण्यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे...

महागाईची तलवार मानेवर लटकत आहे...


इंधनाचा भडका नित्याचा उडत आहे...

शासकाचे प्रेम नोटावरती वाढले आहे...


लोकशाही म्हणायलाच उरली आहे...

मनमानी कारभार सर्वत्र सुरू आहे...


जाती, धर्म, पंथाचा फक्त आव आहे...

तत्वज्ञानाचा उपयोग सोयीने सुरू आहे....


निवडणुका येताच दंगे होत आहे...

मतांची पेरणी मुडद्द्यावरून सुरू आहे...


माध्यमांची पत जनांतून उतरत आहे...

चौथा स्तंभ आता ढासळत आहे...


शेती, व्यापार, उद्योग उपाशी आहे...

एएएम गॅंग मात्र तुपाशी आहे...


आत्मनिर्भरतेची बोलाची कडी आहे...

व्यवस्थेचे शुद्धीकरण गरजेचे आहे...


आपणही सुधारायला हवं आहे...

सत्याने वागणेच पर्याय आहे...


ईश्वरीय मार्गदर्शन जगण्याला पुरसे आहे...

प्रत्येकाचा कल मात्र चंदेरी दुनियेकडे आहे...


-  *बशीर शेख "कलमवाला"*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या