सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन करून प्रतिबंधीत केलेले फटाके विकणारे विक्रेत्यावर विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल.*

 सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन करून प्रतिबंधीत केलेले फटाके विकणारे विक्रेत्यावर विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल.*






लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

             याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जुन गोपाल व इतर विरुद्ध भारत सरकार व इतर यांच्या याचिका सुनावणी दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका वापराबाबत महत्त्वाचे निर्देश देऊन यात फटाक्यांची आतिषबाजी व आवाजामुळे वायू प्रदूषण व ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होतो.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कमी उत्सर्जन करणारे फटाके व ग्रीन कोकर्स प्रकारातील फटाक्याचा वापरास परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व प्रकारच्या फटाका वापर व विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे.

               असे असूनही काही फटाका विक्री करणारे दुकानदार मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून,इतरांचे जीवितास धोका निर्माण होईल,कसल्याही प्रकारची सुरक्षिततेची खबरदारी न घेता प्रतिबंधित फटाकेची विक्री करीत असताना मिळून आल्याने लातूर पोलिसा कडून पोलीस ठाणे अहमदपूर अंतर्गत 04 व पोलीस ठाणे चाकुर अंतर्गत 02 गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

                  यामध्ये पोलीस ठाणे अहमदपूर येथे

1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 462/2021 कलम 286 भादवी.

2) गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/2021 कलम 286 भादवि.

3)गुन्हा रजिस्टर क्रमांक 464/2021 कलम 286 भादवी.

4)गुन्हा रजिस्टर क्रमांक 465/2021 कलम 286 भादवी.

प्रमाणे एकूण चार इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून गुन्ह्यांचा अधिक तपास अमदपुर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार करीत आहेत.

           तसेच पोलीस ठाणे चाकूर येथे 

1)गुन्हा रजिस्टर क्रमांक 501/2021 कलम 188 भादवि.

2)गुन्हा रजिस्टर क्रमांक 502/2021 कलम 188 भादवि. प्रमाणे

एकूण 07 इसमा विरुद्ध 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस स्टेशन चाकुर चे पोलीस अंमलदार करीत आहेत.

             दिवाळीत नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही बंधनं घालून दिल्याप्रमाणेच नागरिकांनी दिवाळीत अतिषबाजी करावी.असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या