त्रिपुरा येथील धार्मिक हिंसाचाराला वेळीच पायबंद घालून दोषींवर कठोर कार्यवाही करा औशात मागणी
औसा (रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो )
त्रिपुरा येथील देशविघातक सांप्रदायीक हिंसाचाराला पायबंद करण्यासाठी वैश्विक स्तरावर भारतीय नैतिक मुल्य व सर्व धर्म समभावाची छवी प्रगाढ तथा आदरयुक्त आहे. वास्तविकतः नविन वैश्विक रचनेत ऐतिहासिक परंपरा लाभलेला आपला देश पृथ्वीतलावरील सर्व मानवजाती तथा राष्ट्रे यांचा आश्वासक नेतृत्व म्हणून उदयास येत असतांना मागील काही वर्षापासून आपल्याच देशातील विघ्नसंतोषी तथा राष्ट्र विघातक शक्तिंनी धार्मिक ध्रुविकरण करून राष्ट्रभावना खिळखिळ करण्याचा राष्ट्रद्रोही कार्य योजल्याचे दिसून येत आहे.
याचाच नविन अध्याय म्हणजे, या राष्ट्रद्रोही शक्तिंनी सध्या काही दिवसां पासून भारताचा अविभाज्य अंग असलेल्या त्रिपुरा राज्यात धार्मिक हिंसाचार माजवून देशवासीयांच्या संवैधानीक अधिकाराची पायमल्ली तसेच वैश्विक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा मलीन करण्याचा केविलवाणा किंतु विखारी प्रयत्न चालविल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रवृत्ती वेळेवर ठेचून काढणे व भविष्यासाठी उदाहरण निर्माण करणे अगत्याचे असल्यागत परिस्थिती येवून ठेपल्यागत वाटते.
म्हणून आपणास आम्ही नम्रपणे निवेदन करतो की, त्रिपुरा व तत्सम धार्मिक हिंसाचाराला वेळीच पायबंद घालून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची कृपा करावी. अशी मागणी तहसीलदार ला दिलेल्या निवेदनात केली आहे
या निवेदन वर
शेख शकील
मन्सूर रूईकर
सक्षम रोख
वसीम खोजन
खुदमिर मुल्ल
अफसर शेख
आदि चे हस्ताक्षर आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.