लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील
संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी): (शनिवार दि. २० नोव्हेंबर २१)
समाजातील उपेक्षित, निराधार, दिव्यांग निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज विनासायास दाखल करता यावेत, कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचीत राहू नये सर्वांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा याकरीता राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून लातूर येथे प्रभागनिहाय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ येथे शाहूनगर, ग्रीनबेल्ट लातूर येथे शिबीर आयोजित करण्यात आले.
या समधान शिबिराचा शुभारंभ शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे शहर जिल्हाअध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष हकीमभाई शेख, सदस्य दगडूआप्पा मिटकरी, सेवादल जिल्हा अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, प्रभाग समन्वयक महेश काळे, नगरसेवक विजयकुमार साबदे, वर्षा मस्के, सोजरबाई मदने, बंडू सोलकर, फारुख शेख, प्रा.प्रविण कांबळे, जी.ई. गायकवाड, बरकतभाई शेख, अमोल गायकवाड, काशिनाथ वाघमारे, मोहन सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती
प्रभाग क्र. 3 मधील शाहू नगर, ग्रीनवेल्ट, बाभळगाव रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या संजय गांधी निराधार योजना समाधान शिबीरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थीना फॉर्म भरण्यासाठी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाभार्थ्यांना विना अनामत बँक खाते उघडून देण्याचे काम समितीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रभागातील कार्यकर्ते व संबंधित अधिकारी यांनी केले आहे.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार साबदे, सुत्रसंचालन राजू गवळी यांनी केले. कार्यकामास मनदिप सवई, शिवाजी सिरसाट, अशोक सुर्यवंशी, नौशादभाई शेख, इम्रान ग्रोंद्रीकर, हिराचंद सितापूरे, अजित सुर्यवंशी, सचिद्र कांबळे, वैभव कांबळे, अतिष मूळे, नितीन साबदे, नबी नळेगावकर, संजय सुरवसे, पवन कांबळे, बादल जाधव, सुमित कांबळे, अभिजीत आडगळे, गंगाराम घोडके, अरूण धावारे, महादू गायकवाड, इस्माईल शेख, तनुजाबाई कांबळे, धम्मपाल माने, श्रावण मस्के, कार्यालय प्रभाग समन्वयक सचिन खोसे आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
-----------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.