गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या अवघ्या 12 तासात आवळल्या मुसक्या. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,(लातूर शहर) च्या विशेष पथकाची कारवाई

 *


*गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या अवघ्या 12 तासात आवळल्या मुसक्या. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,(लातूर शहर) च्या विशेष पथकाची कारवाई






       लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो

 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 19/11/2021 रोजी पुणे येथील एक व्यक्ती व्यापाराच्या निमित्ताने लातूर शहरात आले होते. ते दिवसभर व्यापार करून व्यापारातून मिळवलेले रोख रक्कम व दागिने बॅग मध्ये ठेवून ती बॅग पाठीवर अडकवून संध्याकाळी 8:30 वाजण्याचे सुमारास ते थांबलेल्या लॉज कडे निघाले. काही अंतरावरच मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमाने झटापटी करून फिर्यादीची 04 लाख 57 हजार 450 रुपये ची बॅग हिसकावून घेऊन पळून गेले.



                नमूद फिर्यादी व्यापारीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 615/2021, कलम 394 भादवि प्रमाणे अज्ञात आरोपी त्याविरुद्ध गुन्हा दाखल आला.

         सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांनी भेट दिली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांन्वये सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता, गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे करिता उपविभाग व पोलीस स्टेशन स्तरावर पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून तात्काळ रवाना करण्यात आले .


            सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना लातूर शहर उपविभाग लातूर शहरचे विशेष पथकाला मिळालेल्या विश्वासनीय बातमी वरून संशयित इसम नामे

1) रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे, राहणार_ जुना औसा रोड, लातूर.

2) राहुल राहुल सिंग उर्फ काल्या जयसिंग टाक, राहणार_ गुलटेकडी, दादोजी कोंडदेव नगर, लातूर. 

यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल संदर्भात अधिक तपास चालू आहे.

             पुढील तपास पोलीस स्टेशन गांधी चौक येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. वेंकट कवाळे हे करीत आहेत.



            सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष पथकातील सहायक फौजदार रामचंद्र ढगे, वाहिद शेख, पोलीस अमलदार अभिमन्यू सोनटक्के, महेश पारडे तसेच पोलिस स्टेशन, गांधी चौक पोलीस अमलदार दामोदर मुळे, शिंदे यांनी पार पाडली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या