खाजगीकरणामुळे लोकशाही धोक्यात-आण्णासाहेब नरसिंगे

 खाजगीकरणामुळे लोकशाही धोक्यात-आण्णासाहेब नरसिंगे




लातूर-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा लातूर यांच्या वतीने रा.प.महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या संपास जाहीर  पाठिंबा देत असले बाबत पत्र एस.टी.कर्मचारी बंधुभगिनी यांना देण्यात आले.


यावेळी महासंघाचे राज्य उपमहासचिव दंतराव व्यंकट म्हणाले की, मंत्री, आमदार,खासदार यांना वेतन,भत्ते, पगारवाढ करण्यासाठी शासनाला पैसे आहेत. त्यावेळेस शासनाच्या तिजोरीवर बोजा पढत नाही. पण एस.टी कर्मचार्‍यांच्या वेतन वाढ,भत्ते इतर सुविधा देताना तिजोरीवर ताण पडतो हे न उलगडणारे कोडे आहे.  लातूर जिल्हा अध्यक्ष नरसिंग म्हणाले की, खाजगीकरणामुळे भांडवलदारास चांगले दिवस येतील व सामान्य जनतेचे हाल होतील.समाजात आर्थिक विषमतेची दरी अधिकच वाढेल. याप्रसंगी बोलताना रेणापुर तालुका अध्यक्ष नवनाथ वाघमारे म्हणाले की,सामान्य जनतेची सेवा करणार्‍या राज्य परिवहन कर्मचारी यांना राज्य शासकीय कर्मचार्‍याच्या दर्जा व  सुविधा मिळाव्यात. परिवाहन विभाग हा राज्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेचा मुलभुत भाग आहे. त्यामुळे त्यांचे राज्यशासनात विलिनीकरण करावे. या प्रसंगी जिल्हा महासचिव प्रकाश गायकवाड, विभागीय अध्यक्ष सुर्यवंशी प्रविण, अतिरिक्त जिल्हा महासचिव श्रीमती.रूक्साना मुल्ला,लातूर शहराध्यक्ष कृष्णा जोगदंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जाधव  उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या