मोहम्मंद पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षणासाठी वंचितचे जिल्हा कचेरीवर आज धरणे आंदोलन

मोहम्मंद पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षणासाठी

वंचितचे जिल्हा कचेरीवर आज धरणे आंदोलन







लातूर,दि.२३ःवंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोहम्मंद पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षणासाठी राज्यव्यापाी आंदोलनाचा एक भाग म्हूणन बुधवार,दि.२४ नोव्हंेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदेालन करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजाच्या हितासाठीचा मोहमंद पैंगबर बिल पास करणे  तसेच मुस्लिमांना आरक्षण महंत्वाचे असल्याने या महत्वाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी राज्यव्यापी धरणे आंदेालन प्रत्येक जिल्हा कचेरीसमोर करणार आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्‍या या धरणे आंदोलनात लातूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा,शहर,युवा आघाडी,महिला आघाडी पदाधिकार्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, जिल्हा प्रवक्ता चक्षुपाल कांबळे, युवा जिल्हा महासचिव नितीन गायकवाड, लातूर शहराध्यक्ष ऍड.सुभेदार मादळे आदिंनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या