औसा तालुक्यातील मोगरगा गावातील तूर पिकावर अज्ञात रोगाचा हल्ला

 औसा तालुक्यातील मोगरगा गावातील तूर पिकावर अज्ञात रोगाचा हल्ला










औसा प्रतिनिधी

 लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मोगरगा गावातील किमान 300 हेक्टर क्षेत्रातील तूर पिकावर अज्ञात रोगाने हल्ला चढवला असल्याने संपूर्ण शिवारातील तूर पीक संकटात आहे यामुळे गावातील किमान 800 शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर वाईट परिणाम होणार आहे मुजोर विमा कंपनी आणि उदासीन प्रशासनाचा फटका बसणार असल्याने आता धावा कोणाचा करावा ही वाईट अवस्था मोगरगावासीय शेतकऱ्यांची झालीय.

लातुर जिल्हा हा सोयाबीनच कोठार अशी ओळख असताना चालू वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर आल्याने हाती येणार सोयाबीन पाण्यात गेलं आता औसा तालुक्यातील मोगरगा 1400 हेक्टर शेतजमीन असून त्यापैकी  गावशिवारातील किमान 300 हेक्टर क्षेत्रातील तूर पिकांवर अज्ञात रोगाच्या संकटाने गावातील किमान 800 शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय दरम्यान मधल्या काळात तूर पीक फुल अवस्थेत असताना वातावरणातील बदलाने अज्ञात रोगाचा धोका झाला तुरीला फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली यामुळे शेंगा अत्यल्प लागल्या पण दुदैवाने शेंगात दाणे भरलेच नाहीत जे दाणे भरले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे भरले आता पेरलेले बियाणां इतकं देखील तूर निघेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना आहे  यावर कृषी अधिकारी किंवा कर्मचारी योग्य उपाययोजना आणि मार्गदर्शन करण्यात कमी पडले यातील किमान 75 % शेतकऱ्यांनी तुरीचा पीकविमा देखील उतरवला आहे सोयाबीन पाठोपाठ आता तुरीच उत्त्पन्न हातातून जाणार अशी अवस्था असताना गावकऱ्यांनी औसा येथील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या महसूल प्रशासन, कृषी प्रशासन आणि विमा कंपनीला याबद्दल लेखी माहिती दिली पण प्रशासनातील उदासीनतेमुळे आजतागायत देखील कोणीही तलाठी, कृषी सहाय्यक अथवा विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात भेट देऊन पाहणी केली नाही आता राज्य सरकारने याची दखल घेत मोगरगा गावच्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा हात देण्याची आशा शेतकऱ्यांना आहे शासनाने दिलासा दिल्याशिवाय जगणं कठीण झाले आहे मोगरगा गावात दरवर्षी किमान 6 ते 7 कोटी रुपयांच्या तुटीचे उत्पादन होत असते पण यावेळी पेरलेले बियाणं इतकी तूर निघेल का ? ही शंका शेतकऱ्यांना आहे महसूल विभागाने विमा कंपनीला आदेश देऊन पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तर राज्य शासनाने विशेष आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 



बाईट:- रवी निकम

बाईट:- विक्रम सोनवणे

बाईट:- चंद्रशेखर सोनवणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या