केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरींच्या हस्ते गुरुवारी विवेकानंद रुग्णसेवा सदनचे लोकार्पण
लातूर/प्रतिनिधी:विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲंड रिसर्च सेंटर,लातूर द्वारा उभारण्यात आलेल्या विवेकानंद रुग्णसेवा सदनचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी दि.२५ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.
मागील ८ वर्षांपासून विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
रेडिएशन थेरपीद्वारे उपचार घेणाऱ्या रुग्णांना आठवड्यातील ५ दिवस, दररोज अर्धा तास असे जवळपास दिड महिना उपचार घ्यावे लागतात.यामुळे स्थितीत रुग्ण शारीरिक व मानसिक दृष्ट्या थकलेले असतात.अनेकजण उपचारासाठी बाहेरगावाहून आलेले
असतात.उपचारासोबतच जाणे, येणे,अन्यत्र राहणे व जेवणावर मोठा खर्च होतो.अशा रुग्णांची उत्तम दर्जाची,सवलतीच्या दरात तसेच रुग्णालयाच्या परिसरातच निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी,या हेतूने लोकसहभागातून
रुग्णसेवा सदनची उभारणी करण्यात आलेली आहे.
गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.अनंत पंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कळंब रोडवर एमआयडीसी परिसरात विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विवेकानंद रुग्णसेवा सदन समितीचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे,मार्गदर्शक पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका,विवेकानंद मेडिकल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ.अरुणा देवधर, प्रशासकीय संचालक अनिल अंधोरीकर व विवेकानंद रुग्ण सेवा सदन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.