वीज बील अभावी होणारी शेतकर्यांची विज तोडणी तत्काळ थांबवा
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.22/11/2021
महाविकास आघाडी सरकारने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताकडे दूर्लक्ष करून विजबीलाच्या नावाखाली सक्तीची वसूली सुरू केली आहे. अनुदानाच्या नावाखाली तूटपुंजे अनुदान देऊन महावितरणच्या माध्यमातून थकीत विजबीलाची वसूली केली जात आहे. अगोदरच पावसामुळे बहुतांश शेतकर्यांच्या सोयीबीन व इतर पिकांच्या राशी खोळंबल्या असताना महावितरणने मात्र चालु थकबाकीच्या नावाखाली सहा महिण्याचे वीज बील भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल, असा पवित्रा घेऊन शेतकर्यांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अडचणीच्या कालावधतील होणारी शेतकर्यांची वीज तोडणी तत्काळ थांबवा अन्यथा भविष्यात परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महावितरणला दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या या काळात महावितरण विभागाने थकीत वीज बीलासाठी शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडणे व ट्रांन्सफर जळाल्यानंतर पैसे भरा अन्यथा ट्रांन्सफार्मर मिळणार नाही. अशी भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच कृषी पंपाच्या वीजबीलाबाबतही थकीत 6 महिण्याचे तरी बील भरा आणि कनेक्शन जोडून घ्या. अशा प्रकारचे पत्रक काढून शेतकर्यांना ऐन कामाच्या वेळेत वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. अगोदरच कोरोना, अतिवृष्टी या दूहेरी संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्याला पुन्हा वीलबील थकबाीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून वीज बीलाअभावी होणारी वीज कनेक्शन कट करण्याची प्रक्रिया काही कालावधीपुरती तरी थांबवावी अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महावितरणला दिला आहे.
शेतकरीहिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ
शेतकर्यांच्या वीजबीलाच्या नावाखाली सक्तीची वसूली होत असल्यामुळे शेतकर्यांचे कैवारी, भाजपा नेतेे तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कोरोना व अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना विजबील भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी विनंती केली असता त्यांनी सकारात्मक चर्चा करून शेतकरी हिताचा विचारकरून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे अडणीत सापडलेल्या शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.