दिलीपराव देशमुख वन मॅन आर्मी...
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे 19 पैकी 18 उमेदवार घवघवीत यश संपादन करून विजयी झाले आणि एका उमेदवाराला समान मते पडल्याने टॉस करावा लागला आणि त्यात एक जागा विरोधकाला गेली..बँकेच्या स्थापनेपासून रामचंद्र पाटील तळेगावकर या घराण्याचा अधिकार या बँकेवर होता त्याचे फलित म्हणून रामचंद्र पाटील तळेगावकर यांचे चिरंजीव भगवान पाटील तळेगावकर यांची या टॉसमुळे आज वर्णी लागली.
निवडणुका लागल्या तेव्हाच मी सांगितले होते की,ही बँक केवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू आहे,त्यामुळे विरोधकांनीही मोठ्या मनाने या बँकेची सूत्रे दिलीपराव देशमुख यांच्या हाती देऊन चांगल्या सहकारी संस्था जपायला हव्या होत्या..मात्र लोकशाहीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांना अश्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात.मध्यंतरी एका पुढाऱ्यासोबत बोलताना ते म्हणाले की,आमचाही कधीकधी नाईलाज असतो,आम्हाला पक्षासाठी काही निवडणूका लढवाव्या लागतात.मी म्हणालो,सहकारात थोडे अवघड असते तरीही..त्यांनी संवाद बंद केला..मला वाटते ही निवडणूक खरं तर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या विचारावर विश्वास ठेवून झालेली निवडणूक आहे.जेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी दिलीपराव देशमुख यांच्या हातात जिल्हापरिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँक दिली होती,तेव्हा दोन्ही संस्थांची परिस्थिती फार काही चांगली नव्हती.दिलीपराव देशमुख यांनी या दोन्ही संस्थांना एक शिस्त लावली.महाराष्ट्रातील अनेक बँका आजही डबघाईला आलेल्या आहेत,मात्र लातूर जिल्हा बँकेला शिस्त लावून ती फायद्यात कशी आणता येईल यासाठी केलेले प्रयत्न आणि शेतकऱ्यांसाठी खुली असलेली बँक अशी ख्याती मिळवून देण्यात दिलीपराव देशमुख यांचा महत्वाचा वाटा आहे.विरोधकांनी खूप प्रयत्न केले मात्र दिलीपराव देशमुख यांनी ही निवडणूक आमदार धीरज देशमुख यांच्या खांद्यावर सोपवून सहजपणे आपल्या कार्यभाराच हस्तांतरण करून सगळी निवडणूक धीरज देशमुख यांच्या हातात सोपवलेली दिसून आली.विरोधकांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नेमके याच दरम्यान आणून ईडीची चर्चाही घडवून आणली.ईडीच्या धाडी पडल्या आहेत अशा बातम्या पेरून वादळ उठवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता,मात्र जो मतदार आहे तो कुठेही तसूभरही ढळलेला दिसून आला नाही.सभासदांना विट्ठल रुख्मिणीची प्रतिमा भेट देऊन भावनिक करण्याचा प्रयत्नही या काळात झाला,मात्र विठ्ठलाने आपली पायरी सोडली नाही आणि रुख्मिणीने बँकेची साथ सोडली नाही..सत्ताधाऱ्यांनी धनशक्तीचा उपयोग केल्याचा आरोप विरोधक करत असाल तरीही सहकारात अनेकदा मतदारांना बँकेच्या रोजच्या व्यवहारात संपर्कात राहावे लागते आणि त्याचाच फायदा सत्ताधारी उठवत असतात..खरं तर ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी होताना दिसून येत होती,सहकारातील काही कायद्यामुळे मतदारांवर नियंत्रण आणण्यात सत्ताधाऱ्यांना सगळीकडेच यश आले..खरं तर ही निवडणूक विरोधकांनी लढवायला नको होती मात्र फुकाचा फार्स करून विरोधकांनी आपले हसे करून घेतले..यामुळे पक्षातील बंडखोरीच दिसून आली.आमदार रमेशअप्पा कराड आणि संभाजीराव पाटील यांनीच ही निवडणूक प्रतिष्टेची केली होती,मात्र एक स्पष्टपणे दिसून येत होते की,खरा मतदार कोण?तो शोधण्यातच अनेकजण हैराण झालेले दिसून येत होते.दिलीपराव देशमुख यांना या निवडणुकीचा निकाल माहीतच होता त्यामुळे त्यांनी उमेदवारी देतानाच तशी पेरणी करून विजयी होणाऱ्यालाच संधी देऊन आमदार धीरज देशमुख यांची जबरदस्त लॉचिग या निमित्ताने केली आहे.
विरोधकांनी केलेल्या तोटक्या प्रयत्नांना मतदारांनीही तशीच साथ दिलेली दिसून येते..ही निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णायक असल्याने बँक नेमकी कुणाच्या हातात द्यायची हे सभासदांना चांगलेच माहीत असल्याने,त्यांनीं जात,पात, धर्म,पक्ष न बघता योग्य व्यक्तीच्या हातात ही बँक दिली आहे..
विरोधकांसाठी काही ठळक गोष्टी..
# निवडणूक तयारीने लढावी..
# पराभवाची कारणमीमांसा करावी..
# येणाऱ्या काळात सभासदांना अधून मधून भेटावे..
# सहकार कायद्याचा अभ्यास करून तयारी करावी..
# भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व द्यावे..
# चांगल्याला चांगले म्हणण्याची तयारी ठेवावी..
# विरोधासाठी निवडणूक न लढवता,
ती जिंकण्यासाठी लढवावी..
निवडून आलेल्या मंडळाने आता हे करावे..
# शेतकऱ्यांना न्याय द्यावा
# आश्वासने दिलेली पूर्ण करावीत
# शेतकऱ्यांना पाच लाखाच्या बिनव्याजी
कर्जाची केलेली घोषणापूर्ती करावी..
# ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना मुख्य कार्यालयात आल्यावर योग्य वागणूक द्यावी..
# अनेक गावांना शाखेची गरज आहे त्याची पूर्तता करावी
# अधिकारी कर्मचऱ्यात सुसूत्रता ठेवून अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावा..
# आपण नोकर आहोत ही भावना अधिकाऱ्यात रुजवावी..
# बँक शेतकऱ्यांची आहे व्यापाऱ्यांची नाही याची जाणीव अधिकाऱ्याना व्हावी..
# विश्वासाला तडा जाऊ देऊ नये..
X V. Deshmukh Dhiraj Vilasrao Deshmukh
@ संजय जेवरीकर
पत्रकार/सरपंच
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.