वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन









 औसा प्रतिनिधी

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासाठी तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले महा विकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के हक्काचे आरक्षण लागू करावे तसेच मोहम्मद पैगंबर बिल पास करावे या मागण्यासाठी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले



 देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष लोटले तरी अद्यापही मुस्लिम समाजाचे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण कायम असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही विविध समित्यांच्या आयोगाचे अहवाल प्रलंबित आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाचे शैक्षणिक मागासलेपण कायम असल्याने सरकारची मुस्लिम समाजाबद्दल उदासीनता दिसून येत आहे न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि मोहम्मद पैगंबर बिल तातडीने मंजूर करावे या मागण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात धार्मिक भावना भडकावून आल्यावर कठोर कार्यवाही करावी क्‍फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करावी संत विचाराचा प्रसार करणाऱ्या कीर्तनकारांना शासनाकडून मानधन सुरू करावे सार्थी आणि पार्टी तसेच महा ज्योतीप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

 आंदोलनात श्रावण कांबळे,सतीश गायकवाड,सुभाष भालेराव, भिमसेन गायकवाड, इंद्रजित जाधव सर्वश्री दयानंद गायकवाड, इलियास चौधरी,  संजय कांबळे, गजेंद्र गिरी, सिद्धार्थ मस्के, सूर्यकांत उबाळे, राधिका गवारे, रेखा महादेव लांडगे, बाबू लांडगे, मुक्ताबाई

 दंडगुले, निर्मला ,चव्हाण  जिजाबाई लांडगे जिजाबाई,अभिजीत लोखंडे, कैलास कांबळे, ओमकार खरात, उमाकांत लांडगे, मारुती कांबळे, शरद कोळी, गोरोबा गायकवाड, प्रभाकर सोनवते यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या