उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,लातूर शहर यांचे विशेष पथकाची कारवाई.. शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीतील आरोपीस 12 तासाचे आत अटक. गुन्ह्यातील गेला मुद्देमाल 48 तासात 100% हस्तगत..
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 19/11/2021 रोजी पुणे येथील एक व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने लातूर शहरात आले होते. त्यांनी त्यांचे पाठीवर सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25000/_ असलेली बॅग अडकवून व्यापार करून परत ते राहत असलेल्या लॉज कडे पायी चालत जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवून रात्री 08:30 वाजण्याच्या सुमारास एका कापड दुकानाजवळ, रोडवर फिर्यादीचे पाठीवर असलेली दागिन्याची व रोख रकमेची बॅग अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ असलेल्या रिवाल्वर सारख्या हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी जवळील सोन्याची दागिन्याची व रोख रक्कम असा एकूण 05 लाख 48 हजार 240 रुपये ची बॅग हिसकावून घेऊन मोटार सायकल वर बसून पळून गेले होते.
तक्रारदाराच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 615/ 2021 कलम 394 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वेंकट कवाडे हे करीत आहेत .
सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे यांनी भेट दिली. व वरिष्ठांचे आदेशान्वये श्री.जितेंद्र जगदाळे यांनी त्यांचे विशेष पथकातील पोलिस अंमलदारांना तपासाचे अनुषंगाने सूचना देऊन शहरात रवाना केले.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना विशेष शाखेतील सहाय्यक फौजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, यशपाल कांबळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी 1)रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे, राहणार_ जुना औसा रोड लातूर व एक संघर्ष बालक अशांना निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस करून 12 तासाच्या आत आरोपींना अटक केली.
त्यांनी गुन्ह्यात चोरलेली रक्कम व सोन्याचे दागिने असा 05 लाख 48 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल व पिस्टल सारखा दिसणारा हत्यार जप्त केला आहे .विशेष पथकातील पोलिसांनी 48 तासांच्या आत जप्त गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नमूद आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने एका आरोपीस पोलिस कस्टडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष शाखेतील सहाय्यक फौजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, तसेच स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पोलीस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर यशपाल कांबळे, पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अमलदार दामोदर मुळे व शिंदे यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.