स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई मोटरसायकल चोरणारे व चोरलेल्या मोटरसायकलचे पार्ट वेगवेगळे करून विकणाऱ्या एकूण 05 आरोपींना अटक. 01 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त


 

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई मोटरसायकल चोरणारे व चोरलेल्या मोटरसायकलचे पार्ट वेगवेगळे करून विकणाऱ्या एकूण 05 आरोपींना अटक. 01 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त


या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री दिनेश कुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. गजानंन भातलवंडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यात घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता  पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून तपास पथके तयार करण्यात आले होते.

             काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या एका मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता तयार करण्यात आलेले पथके गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना सदर तपास पथकाला माहिती मिळाली की, काही दिवसापूर्वी पोलीस ठाणेला दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी झाली होती.त्या मोटर सायकल चे पार्ट वेगवेगळे करून विकण्याचे काम देवणी तालुक्यातील वलांडी येथील काही मेकॅनिक करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर पथक त्या ठिकाणी पोहोचून वलांडी येथील बसस्थानक चौकात असलेल्या किरण ऑटोमोबाईल्स समोर मोटर सायकल दुरुस्तीचे काम करणारे मोटार सायकल मेकॅनिक नामे

1) शिराज चांद पाशा बावडी वाले वय पंचवीस वर्ष व्यवसाय मेकॅनिक राहणार वलांडी

2) संगमेश्वर तुकाराम पुंडे वय पंचवीस वर्ष व्यवसाय मेकॅनिक राहणार माणकेश्वर तालुका भालकी

3) कृष्णा कुंडलिक कांबळे वय 24 वर्षे व्यवसाय मेकॅनिक राहणार बोंबळी बुद्रुक तालुका देवनी

4) नानासाहेब विश्वनाथ गायकवाड वय 27 वर्ष व्यवसाय मेकॅनिक राहणार चव्हाण हिप्परगा तालुका देवनी

अश्या इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मौजे हेळंब येथे राहणारा दशरथ यादव सूर्यवंशी हा चोरीच्या मोटारसायकली घेऊन येतो व आम्हाला फोन करून बोलावून घेऊन त्याने चोरलेल्या मोटरसायकली ह्या खोलून त्याचे पार्ट वेगळे करायला लावून दुसऱ्या जुन्या मोटरसायकलींना गरजेप्रमाणे इंजन व इतर पार्ट इतर लोकांना विक्री करतो असे सांगितले त्यावरून नमूद पथकाने

दशरथ यादवराव सुर्यवंशी, राहणार- हेळब यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सांगितले की अंदाजे 8 ते 9 महिन्यांपूर्वी एक हिरो डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच 24 AR 6460 ही मीच चोरली असून त्या मोटरसायकलचे इंजिन इतर पार्ट ओळखीचे वलांडी येथील किरण ऑटोमोबाईल दुकानाचे समोर मेकॅनिक काम करणारे शिराज बावडीवाले, संगमेश्वर पुंडे, कृष्णा कांबळे, नाना गायकवाड यांच्या मदतीने पार्ट काढून लोकांना विक्री करतो व चोरलेल्या मोटरसायकली चे चेसिस विहिरीत टाकून देतो असे सांगितले. 

         त्यावरून सदरची विहिरीतून 03 मोटारसायकलचे चेसिस व शिराज बावडीवाले व संगम पुंडे यांचेकडून इतर स्पेअर पार्ट हस्तगत करण्यात आले.

त्यावरून आरोपी नामे

1) शिराज चांदपाशा बावडीवाले, वय-25 वर्ष, व्यवसाय मेकॅनिक, राहणार वलांडी.

2) संगमेश्वर तुकाराम पुंडे  वय 25 वर्षे, व्यवसाय-मेकॅनिक राहणार माणकेश्वर ता. भालकी.

3) कृष्णा कुंडलिक कांबळे, वय 24 वर्ष ,व्यवसाय- मेकॅनिक राहणार बोंबळी बुद्रुक तालुका देवनी.

4) नानासाहेब विश्वनाथ गायकवाड, वय 27 वर्ष, व्यवसाय मेकॅनिक राहणार चवनहिप्परगा ता. देवनी.

5) दशरथ यादोराव सूर्यवंशी, वय 24 वर्ष, व्यवसाय मजुरी राहणार हेळंब

 यांना पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण गुन्हा रजिस्टर क्रमांक 498/21कलम 379 भादवी मध्ये अटक करण्यात आली असून नमूद आरोपी  कडून आणखीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

          आरोपींना मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 02 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

          सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथील पोलीस अंमलदार शिरसे हे करीत आहेत.

             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि राहुल बहुरे, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे ,जमीर शेख, राजू म्हस्के दिनेश देवकते, नकुल पाटील वलांडी दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे आणि त्यांचे सहकारी यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या