शांतता अबाधित ठेवण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने कार्य करावे - सहा. पोअ. पंकज कुमावत .

 शांतता अबाधित ठेवण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने कार्य करावे - सहा. पोअ. पंकज कुमावत 






केज, (प्रतिनिधी): दंगली, बंद, तोडफोड यामुळे कुणाचेही कधीच भले होत नाही, मात्र सर्व सामान्य, गरीब, कष्ठकर्याचे नुकसान होत असते. त्यामुळे केज व परिसरात शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे तसेच सोशल मीडियावर तरुणांने शांतता भंग होईल असे काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करू नयेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज पो.स्टे. येथे आयोजित शांतता बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले.


दि. १३ शनिवार रोजी सायंकाळी ७ वा. ही शांतता बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीला शहरातील हिंदू, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक से मौलवी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित मार्गदर्शन जपो स्टे सपोनि शंकर बाघमोडे यांनी


केले. सर्व समाजासोबत एकत्र राहून एकजुटीने रहावे, कारण आपण जिथे राहतो तेथील समाज आपले कुटुंब गाव सुरक्षित रहाने हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजकंटकाच्या ऐकव्यामुळे आपला एकोपा तुटू देऊ नये ही सर्व समाजाची जबाबदारी


आहे, असे मत व्यक्त केले तर गटनेते हारूनभाई इनामदार यांनी केजची शांतता कदीही भंग होणार नाही यासाठी आम्ही केजवासीय सदैव तत्पर आहोत यापुढेही समजा समाजात सलोखा कायम राहील याची खात्री पोलीस प्रशासनाला दिली. यावेळी शेकापचे भाई मोहन गुड, न.प.चे माजी उपाध्यक्ष दलीलभाई इनामदार, केज रोटरीचे अध्यक्ष, नगरसेवक राजूमाई इनामदार, लखन हजारे तसेच पत्रकार विजय आरकडे, गौतम बचुटे दिपक नाईकवाडे, माजेद शेख, अर्शद शेख व हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. शांतता बैठकीच्या यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी सपोनि मिसळे, शेख मतीन व सर्व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या