राष्ट्रीय युवा पुरस्कार २०१९-२० साठी अर्ज करण्याचे आवाहन

 राष्ट्रीय युवा पुरस्कार २०१९-२० साठी अर्ज करण्याचे आवाहन





लातूर दि. १४: युवा विकासाचे कार्य, आरोग्य क्षेत्रातील नवीन उपक्रम व संशोधन, संस्कृती, मानवी हक्कांबाबत कार्य, कला व साहित्य, पर्यटन, पारंपारिक औषधे, सक्रीय नागरीकत्व, सामाजीक सेवा, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठता व अद्यावत शिक्षण इ. क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या युवकांना केंद्र शासनाच्या वतिने "राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र युवक व युवर्तीकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या कामी युवक व युवतींनी केंद्र शासनाच्या https://innovate.mygov.in/national-youth-award-२०२० या लिंकवरुन दि. १९ नोव्हेंबर, २०२१ पुर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांनी केलेले आहे. ऑनलाईन अर्ज करणा-या युवक व युवतींनी ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावांच्या दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयात सादर कराव्यात म्हणजे त्यांचे अर्ज राज्यस्तर समितीच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करणे सोईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांनी कळविलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या