विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे कॅन्सर आजाराची शस्त्रक्रिया सुविधा चालू करा:- खुंदमिर मुल्ला

 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे कॅन्सर आजाराची शस्त्रक्रिया सुविधा चालू करा:- खुंदमिर मुल्ला







औसा प्रतिनिधी

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर येथे कॅन्सर आजाराची व शस्त्रक्रिया सुविधा चालू करा अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने दि.10 नोव्हेंबर 2021 बुधवार रोजी लातुरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे लोकनेते कै. विलासराव देशमुख यांनी भविष्याचा विचार करून लातूर जिल्ह्यातील व परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी लातूर येथे शासकीय महाविद्यालयात शासनाकडून मंजूर करून घेतले ज्यामुळे आज लातुर जिल्ह्यासह आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांचे व तसेच इतर राज्यांचे गोरगरीब रुग्णांना या शासकीय रुग्णालयात अनेक विविध आजारांवर उपचार मिळत आहे.व तसेच मागिल कोरोना काळात या शासकीय महाविद्यालयात हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत.लोकनेते कै.विलासराव देशमुख यांच्यामुळे हे रूग्णालय उभे राहिले आहे.आज ज्या प्रकारे कॅन्सर सारख्या महारोगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील व परिसरातील अनेक गोरगरीब कॅन्सर ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी बार्शी, पुणे, मुंबई येथे जावे लागत आहे.ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांसह आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक आजारांवर यशस्वीपणे उपचार व विविध शस्त्रक्रिया होत आहे.यासोबत महाविद्यालयात कॅन्सर सारख्या महारोग उपचार चालू करण्याचे काळाची गरज असून मा. पालकमंत्री यांनी याबाबत विचार करून विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कॅन्सर उपचाराची सुविधा चालू करण्यासाठी सूचना करुन गोरगरीब कॅन्सर ग्रस्त रुग्णांना न्याय द्यावा.अश्या मागणीचे निवेदन  विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या