विठ्ठल पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार जाहीर
गुणीजन गौरव महापरिषद तर्फे जाहिर
औसा प्रतिनिधी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद पुरस्कार2021 चा पत्रकार पांचाळ विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 5नोव्हेंबर 2021 रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास पद्मश्री डॉ विजयकुमार शहा हे समारंभाचे अध्यक्ष असून यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.अशी माहिती पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष अॅड कृष्णा जगदाळे यांनी दिली असून सदरील पुरस्कार आॅनलाइन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातुन विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या या मान्यवरांच्या सोहळ्यात औसा तालुक्यातील गुळखेडा येथील पांचाळ विठ्ठल बालाजी यांची निवड झाली असून त्यांना मानाचा फेटा ,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरव पदक ,सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय आदर्श दर्पण पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.