अपंग जनता दल (सामाजिक संघटना) जिल्हा लातूरच्या वतीने 100 गरीब गरजू अपंगांना दिवाळी निमित्त किराणा वाटप

 अपंग जनता दल (सामाजिक संघटना) जिल्हा लातूरच्या वतीने 100 गरीब गरजू अपंगांना दिवाळी निमित्त किराणा वाटप



संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या हस्ते  किराणा वाटप 






लातूर: अपंग जनता दल हि एक अराजकीय असून सामाजिक संघटना आहे. या संघटने मार्फत अपंगांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अपंगांना न्याय व हक्क मिडून देण्यात कार्य सुरू असून  अपंगांच्या प्रत्त्येक समस्या सोडविण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना कटीबद्द आहे.अपंग जनता दल (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्यच्या वतीने दर वर्षी दिवाळी निमित्त गरीब गरजूंकरिता अपंगांना किराणा वाटप करण्यात येते.आणि दर वर्षी प्रमाणे या वर्षी हि दिवाळी निमित्त जिल्हा लातूर च्या वतीने राज्य उपाध्यक्ष शंकर भाऊ सर्जे याचा पुढाकारने लातूर जिल्हातील गरीब गरजू 100 अपंगांना संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या अध्यक्षेत दि. 03/11/2021 रोजी लातूर जिल्हा कार्यलय येते किराणा वाटप करण्यात आले.यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे . श्री. शंकर सर्जे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.  सौ. पुजा सर्जे लातूर जिल्हा महिला अध्यक्षा. श्री. शमशोधीन तांबोळी लातूर शहर अध्यक्ष. उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अकील शेख सर व उस्मानाबाद उपाध्यक्ष सलीम पटाण सर. भिमराव यादव लातूर तालुका अध्यक्ष. सुर्यकांत पवार औसा तालुका अध्यक्ष. गणेश पाटील औसा शहरध्यक्ष. व दिव्यांग बांधव प्रमुखाने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या