औसेकरांचे मानाचे फुल बिरुदेव मंदिराकड़े रवाना
औसा (प्रतिनिधी) उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथील प्रसिद्ध बिरुदेव मंदिर येथे दीपावली मध्ये बलिप्रतिपदा दिवशी भव्य यात्रा भरत असते. या यात्रे मध्ये महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक राज्यातील हजारो बिरुदेव भक्त यात्रेत मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. या बिरूदेव मंदिरासाठी औसा येथील धनगर समाजाचा वतीने मानाचे फुल चढविण्यात येते. हे फुल औसा ते उमरगा पायी जाणाऱ्या भक्तांने घेऊन जाण्याची परंपरा आहे. त्यानंतर विजापूर येथील बाशिंग चढवून नंतर रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येते. धनगरी गजा ढोलाच्या निनादात मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर बिरू देवाचे पुजारी यांच्या अंगात येऊन पुढील वर्षाचे भाकित त्यांच्या वतीने सांगण्यात येते. मागील अनेक वर्षापासून ही परंपरा चालू असून बिरुदेव मंदिर यात्रेमध्ये बिरूदेवाच्या पुजार्यांनी सांगितलेले भविष्य खरे ठरते अशी विश्वस्त भावना भक्त गणांमध्ये आहे. अंगात आलेले हे बिरुदेव भक्त पुजारी पुढील वर्षासाठी पावसाची आणि पशुधनास मानव जातीच्या आरोग्याचे भाकित सांगतात. याच दिवशी धनगर समाजाचा विराट मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये परिसरातील धनगर समाज बांधव समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकासाबाबत जनजागृती करतात. हैदराबाद मुंबई राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर उमरगा चौरस्ता नजीक हे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराची दरवर्षी दीपावलीच्या पाडव्याला मोठी यात्रा भरते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.