त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिरात दीपोत्सव संपन्न.
औसा (प्रतिनिधी )- औसा शहरातील भाविक भक्तांचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मंदिर समितीच्या वतीने ह-भ-प मारुती भोग महाराज जायफळकर यांचे किर्तन कार्यक्रम आयोजित केले होते . सायंकाळी साडेसहा वाजता एक हजार एक पणत्या लावून मुक्तेश्वर मंदिर आणि दर्शन मंडपात दिपोत्सव साजरा केला . मंदिराच्या शिखरावर मंदिर समितीच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी श्री मुक्तेश्वर देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी तसेच मंदिराचे पुजारी , यांच्यासह भाविक भक्त व शेकडो महिला उपस्थित होत्या . अनेक वर्षापासून ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सहस्त्र पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा शहरातील भाविक भक्तांनी जोपासली आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.