*गरीबी हे ड्रॉपआऊटचे मुख्य कारण : जावीद शेख* *खादिमाने उर्दू फोरमचा दहावी उत्तीर्ण ड्रॉपआऊट विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न्*

 *गरीबी हे ड्रॉपआऊटचे मुख्य कारण : जावीद शेख*

*खादिमाने उर्दू फोरमचा दहावी उत्तीर्ण ड्रॉपआऊट विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न्*













सोलापूर- गरीबीमुळे सामान्य माणसाला पुढील शिक्षण पूर्ण करणे शक्य होत नाही त्यामुळे समाजात ड्रॉपआऊट विद्यार्थी निर्माण होतात. ड्रॉपआऊट झालं म्हणून आपण खचीकरण होऊ न जाता त्याचा मार्ग शोधून पुढे शिक्षण चालू ठेवले पाहिजे. समाजात खादिमान संस्थेसारखे अनेक संस्था आहे जे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणून विद्यार्थ्यांना जीवनात पुढील दिशा दाखवते,  ड्रॉपआऊट कसे कमी होईल याचावर काम करणे आवश्यक आहे, महिलांना शिक्षण क्षेत्रात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना जर फातीमा शेख यांची साथ मिळाली नसती तर त्यांनी एवढा मोठा कार्य करता आले नसते, उर्दू शायरीबद्दल सांगताना त्यांनी सांगितले कमीत कमी शब्दात मोठा संदेश देणे हे याचे एक वैशिष्टय आहे, महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फोरमनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावीद शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खादिमाने उर्दू फोरमच्यावतीने NIOS तर्फे जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले होते त्यांचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम हॉटेल प्रथमच्या सेमीनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष असिस्टंट ट्रेझरी ऑफीसर सरफराज मोमीन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावीद शेख, फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख, समन्वयक रफीक खान, अ.मन्नान शेख आदी उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात हाफिज सुलेमान चौधरी यांनी कुरान पठण करून केले.  संस्थेचा परिचय व कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष विकारअहमद यांनी सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शफी शेख (कॅप्टन) यांनी करून दिला. सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे शुभ संदेश अय्युब नल्लामंदू यांनी वाचून दाखविले.  प्रमुख पाहुणांचा सत्कार उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू व खजिनदार नजीर मुनशी यांनी केला.  विद्यार्थ्यांना ज्ञानाचे कार्य करणारे शिक्षक अ. मन्नान शेख, इरफान बाणकरी, मुबिन बिजापुरे आदी शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांचो हस्ते करण्यात आला. प्रमाणपत्र विद्यार्थ्यांची नावांची घोषणा नासीर आळंदकर यांनी केली व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात असिस्टंट ट्रेझरी ऑफिसर सरफराज मोमीन म्हणाले की, आपल्या समाजामध्ये ड्रॉपआऊटची संख्या जास्त आहे.  हि आपली जबाबदारी आहे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थ्यांनी अशा संस्थेमार्फत आपले शिक्षण पूर्ण करून जीवन पुढील जीवनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. विद्यार्थ्यांनी जे आपले मित्र मंडळी असेल जे शिक्षण अपूर्ण ठेवले असेल त्यांना अशा संस्थेत प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्यात प्रोत्साहन करावे.

यावेळी मुंबईचे सेवानियुत्त एसीपी म. हनीफ पिरजादे, मजहर अल्लोळी, इक्बाल बागबान, सिराज बिजापुरे, महिबुब कुमठे,  नियामत पीरजादे, लियाकत अली वड्डो, हमीद बल्लोलखान, शमीम चांदा, लोकपलली, उटकुर, कदिर वळसंगकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ. मन्नान शेख यांनी केले तर आभार NIOS समन्वयक रफीक खान यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या