भावसार रोड येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ

 भावसार रोड येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ







 औसा प्रतिनिधी

 औसा शहरातील भावसार रोड येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे चा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बुधवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला नगराध्यक्ष अफसर शेख यांनी दिलेला शब्द पूर्ण करून भावसार रोड च्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम सुरू केले असून हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून जनतेच्या मागणीप्रमाणे हा रस्ता अत्यंत चांगल्या दर्जाचा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी संपादक रोहित हंचाटे ,माजी उपनगराध्यक्ष मेहराज शेख, नगरसेवक अंगद कांबळे, नगरसेवक समीर डेंग, महेश अपसिंगेकर नगरसेवक रुपेश दूधनकर, परवेज काझी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या