वसीम भैया मित्र मंडळच्या वतीने कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन
औसा प्रतिनिधी
असा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील इंद्रा नगर येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन वसीम भैया मित्र मंडळ यांच्यावतीने आज दिनांक 29 नोव्हेंबर 2021 सोमवार रोजी आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये औसा शहरातील नागरिकांच्या सोयीकरता आपल्या प्रभागात लसीकरण अभियान सुरू आहे. तरी नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना आजच त्वरीत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वसीम भैया मित्र मंडळचे अध्यक्ष वसीम खोजन यांनी केले. या शिबिराचे शुभारंभ मौलाना कलीमुल्ला, खलील अहेमद सिद्दिकी, अकबर भैय्या खोजन,खुंदमीर मुल्ला, या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या शिबीरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयाचे ता.आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव, आरोग्य सहाय्यक डॉ लोहार बी, ढाकणे वंदना,रवीना कांबळे,औषध निर्माता श्रीनिवास मुदगडे, रजिस्टर भैय्यासाहेब रोंगे यांनी या शिबिरामध्ये सहकार्य केले.
यावेळी या शिबिरामध्ये 503 नागरिकांनी लसीकरणचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिराचे आयोजक आसिफ सय्यद,फेरोज भाई, फारुख शेख,नासेर शेख, रऊफ भाई, इरफान कुरेशी, भालचंद्र पवार, राजाभाऊ,राजु खोजन,नदीम सिद्दीकी,अलीम शेख,मैनोद्दीन शेख,लतीफ सय्यद,दादा लोणे,जुबेर खोजन,पप्पु खोजन,आसीफ शेख,रमजान सय्यद,असलम खोजन,आजम खोजन,आबेद पठाण,ताजोद्दीन शेख, इम्रान कुरेशी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.