पोलीस ठाणे, गांधी चौक येथे दाखल बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 07 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 1,000/_ रुपयाचा दंड.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 05/02/2016 रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की, नमूद गुन्ह्यातील आरोपीतनी पीडित अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिचे इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने धमकी देऊन शारीरिक संबंध केले. वगैरे फिर्याद वरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 71/2016 कलम, 363, 376(2)(i), 354 (D),506, 34 भा.द.वि. सह कलम 4, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम-2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. गीते यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून साक्षीदाराकडे सखोल विचारपूस करून आरोपी विरुद्ध भरपूर सबळ व भौतिक पुरावे गोळा करून मा.विशेष सत्र न्यायालय (POCSO) लातूर. येथे आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
सदर दोषारोपत्रा मध्ये आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे असल्याने मा.विशेष सत्र न्यायाधीश श्री.बी.सी. कांबळे यांनी आरोपी नामे मनोज छगन कांबळे, वय 25 वर्ष यास त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून 07 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 1,000/_ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तसेच दंड न भरल्यास 06 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नमूद गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. एम.गीते यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून आरोपीस शिक्षा घडवून आणली. तसेच त्यांना तपासकामी पोलीस स्टेशन गांधीचौक चे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे ,पोलीस अमलदार एन. एन. बेडदे, तसेच सध्या ट्रायल मॉनिटरिंग सेल येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस अमलदार सुमन कोरे, यांनी परिश्रम घेतले. सरकार पक्षातर्फे एड.मंगेश महिंद्रकर यांनी बाजू मांडली.
कालच दिनांक 30/11/2021 रोजी मा.विशेष सत्र न्यायालय,अहमदपूर यांनीही बाललैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.
एकंदरीत मा. न्यायालयांच्या या न्याय निवाड्यामुळे महिला व बालका सोबत गैरवर्तन करणारे अपप्रवृत्तींना जबर चपराक बसली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.