औसा प्रभाग क्रमांक 6 मधील हसीना गर्ल स्कुल येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मोमीन गल्ली,ढोर गल्ली,खडकपुरा,भोई गल्लीतील नागरिकांच्या सोयीकरीता आपल्या प्रभागात कोव्हीड लसीकरण हसीना गर्ल स्कुल येथे आज दिनांक 1 डीसेंबर 2021बुधवार रोजी कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले.या शिबीरामध्ये नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी जास्तीत जास्त कोव्हीड लसीकरणचा लाभ घ्यावा व येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये सुरक्षित रहावे असे आवाहन मोमीन समाजाचे खुंदमीर मुल्ला यांनी केले आहे.आपला प्रभाग आपली जबाबदारी या अनुषंगाने या शिबीरामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबीरामध्ये पहिला डोस 305 नागरिकांनी लाभ घेतला.व दुसरा डोस 20 नागरिकांनी या लसीकरणचा लाभ घेतला . यावेळी पहिला व दुसरा डोस असे एकूण 325 नागरिकांनी या लसीकरणचा लाभ घेतला.या शिबीरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव, आरोग्य सहाय्यक डॉ लोहार बी पी, लखन लसणे,रवीना कांबळे, भैय्यासाहेब रोंगे आदिनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.