आघाडी सरकारने दिलेल्या ५ % मुस्लीम आरक्षण लागु करा मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उदगीरच्या वतीने उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

 आघाडी सरकारने दिलेल्या ५ % मुस्लीम आरक्षण लागु करा मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उदगीरच्या वतीने उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन 







उदगीर : 2014 मध्ये आघाडी सरकारने मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाची अमंलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षाने पाठपुरावा करावा अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उदगीरच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत काल निवेदन देवुन करण्यात आली.


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या महा-विकास आघाडी सरकारने सत्तेत येऊन २ वर्षे पूर्ण झाली पण मुस्लीम समाजाला ५ टक्के दिलेल्या आरक्षणाची अमंलबजावणी अद्यापही झालेली नाही. 


महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आपण शासनाकडे याचा पाठपुरावा करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी इरफान शेख,सय्यद नौशाद अली,शेख मोहियोद्दीन,अजीम दायमी,अहमद सरवर,फेरोज देशमुख,इमरान मणियार,अबरार पठाण,समीर शेख, अलीम तांबोली,मौलाना झाकीर.अशफ़ाक शेख,मौलाना युसूफ,इमरान शेख,हाश्मी सोहेल,इमरान शेख, मुसा पठान, मौलाना अजीज पटेल,मजहर पटेल,अखिल शेख, शेख अझरोद्दीन,शफी हाशमी यांच्यासह सर्व मुस्लिम समाजाचे समाजबांधव उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या