15 ते 18 वर्षे वयोगटातील, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन कोविड लसीकरणाचा डोस
लातूर,दि.1 (जिमाका):- देशात 16 जानेवारी, 2021 कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली असून त्यामध्ये 60 वर्षाच्यावरील नागरिकांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 45 ते 60 वर्षे व 18 ते 44 वर्षे वयाच्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिनांक 3 जानेवारी, 2022 पासून संपूर्ण देशामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड-19 लसीकरण सुरु करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच त्यामध्ये फक्त कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे. हेल्थ केअर वर्कमर, फ्रंट लाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना दिनांक १० जानेवारी, 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. प्रिकॉशन डोस देतांना संबंधित लाभार्थ्यांने दुसऱ्या तारेखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण कलेले असले पाहिजे.
60 वर्ष वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टारांच्या सल्ल्याने दिनांक 10 जानेवारी, 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. प्रिकॉशन डोस देतांना संबंधित लाभार्थ्यांने दुसऱ्या डोसच्या तारेखापासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण कलेले असले पाहिजे.
हा लसीकरणाचा डोस जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रामध्ये देण्यात येणार आहे.
कोविड-19 प्रथम लसीकरणाचा डोस घेतलेल्या
नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे
देशात 16 जानेवारी, 2021 कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली असून त्यातंर्गत लातूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 20 लाख 25 हजार 419 नागकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट राज्यस्तरावरुन देण्यात आले होते. आजपर्यंत एकूण 15 लाख 56 हजार 199 इतक्या नागरिकांनी प्रथम लसीकरणाचा डोस करण्यात आलेले आहे. तसेच अद्याप 4 लाख 96 हजार 220 नागरिकांचे लसीकरण प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील लसीकरण न झालेली एकूण टक्केवारी 23.17 टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात कोविड -19 लसीकरणातंर्गत प्रलंबित दुसरा डोस न घेतलेल्या
नागरिकांचे 2 लाख 13 हजार 970 इतके लसीकरण प्रलंबित
देशात 16 जानेवारी, 2021 कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली असून त्यातंर्गत लातूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 20 लाख 25 हजार 419 नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट राज्यस्तरावरुन देण्यात आले होते. आजपर्यंत एकूण 15 लाख 56 हजार 199 इतक्या नागरिकांनी प्रथम डोसचे लसीकरण केलेले आहे. त्याची टक्केवारी 76.83 टक्के इतकी आहे. परंतु, आजपर्यंत लातूर जिल्ह्यातध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 8 लाख 64 हजार 40 इतकी आहे. त्याची टक्केवारी 42.66 टक्के इतकी आहे. याबाबतची तालुकानिहाय आकडेवारी पूढील प्रमाणे आहे.
कोविड -19 लसीकरणातंर्गत प्रलंबित दुसरा डोस तालुकानिहाय अहमदपूर तालुक्यात 21 हजार 91 , औसा तालुक्यात 26 हजार 147, चाकूर तालुक्यात 14 हजार 166 , देवणी तालुक्यात 9 हजार 339 , जळकोट तालुक्यात 10 हजार 103 , लातूर तालुक्यात 63 हजार 69 , निलंगा तालुक्यात 25 हजार 901 , रेणापूर तालुक्यात 16 हजार 155 , शिरुर अनंतपाळ तालुक्यात 5 हजार 677, उदगीर तालुक्यात 22 हजार 3222 असे जिल्ह्यात एकूण 2 लाख 13 हाजर 970 नागरिकांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रावर जावून आपले लसीकरण करुन घ्यावे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.