विकास वाचनालयाचा 52 वा वर्धापन दिन साजरा
. औसा, दि. 14 ः औ येथील विकास वाचनालयाचा आज दि. 14 जानेवारी 2022 रोजी 52 वा वर्धापन दिन अगदी प्रमुख मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन संपन्न झाला.
औसा येथे 14 जानेवारी 1971 रोजी विकास वाचनालयाची स्थापना झाली. त्यावेळेस पासून वाचनालयाचे जुने वाचक गेल्या 30 वर्षापासून नियमित या वाचनालयामध्ये वाचन करीत असतात. विकास वाचनालामध्ये ग्रंथसंपदा 34,530 तसेच 19 दैनिके, 105 मासिक त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेचे सर्व पुस्तके या वाचनालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच संगणक, प्रिंटर झेरॉक्स आणि मराठी भाषेतील 20 विश्वकोष हे सर्व उपलब्ध आहेत.
या प्रसंगी औसा येथील विकास वाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अब्दुल सौदागर व उद्योजक तथा मुक्तेश्वर संस्थेचेh अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवलिगप्पा औटी, रामदास नाईक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. मुक्तेश्वर वागदरे, रविअप्पा राचट्टे, वाघमारे, देविदास शेटकार, विकास वाचनालयाचे सचिव धनंजयअप्पा कोरके, जयराजअप्पा उटगे, ग्रंथपाल विकास चिरके, लिपीक विलास कुलकर्णी, रवि कोपरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. हालकुडे सर यांनी तर उपस्थितांचे आभार विकास वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल गिरीधर जंगाले यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.