*रुग्णांची वाढती संख्या त्यावेळी राज्यात ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागेल- राजेश टोपे
* राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन लागणार का?, असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. यावर खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन लागले. त्यावेळी ऑटोमॅटिक राज्यात लॉकडाऊन लागेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत. ते औरंगाबादमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली
राजेश टोपे म्हणाले की, “कोरोना चाचण्या सर्वच ठिकाणी वाढवण्यात आल्या आहे. मुंबईत आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट ५ टक्क्यांवर गेलाय तसंच दिवसाचा १० टक्क्यांवर गेलाय. विशेष म्हणजे राज्यातील मेट्रो शहरात विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये पॉझिटिव्ह रेट वाढत असल्याचं पाहायला मिळतंय”
सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. याबाबत कुणीही अफवा पसरवू नये. ज्यावेळी राज्यात ७०० मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल, त्यावेळी आपोआपच राज्यात लॉकडाऊन लागेल. पण असं असलं तरी सध्याची परिस्थिती पाहता राज्यात निर्बंध कडक करावे लागतील. यासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली
बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता यावर पुढचे निर्णय अवलंबून असतील. लॉकडाउनचा परिणाम अर्थकारण होतो, हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पाहिलं आहे. पण ‘जान है तो जहाँ है’, त्यामुळे गरज पडल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, मात्र निर्बंध पहिलं पाऊल आहे. मात्र आज आपण एका टप्प्यात निर्बंध लावले असले तरी गरज पडल्यास पुढं कठोर कारवाई सुध्दा करु, असंही टोपे म्हणाले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.