मुस्लीम विकास परिषदेच्या शहराध्यक्षपदी नदीम सय्यद यांची निवड

 मुस्लीम विकास परिषदेच्या शहराध्यक्षपदी नदीम सय्यद यांची निवड







औसा मुख्तार मणियार

मुस्लीम विकास परिषदेची बैठक तालुका अध्यक्ष मन्सूर रुईकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 31 डिसेंबर 2021 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता औसा येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये मुस्लीम विकास परिषदेच्या तालुकाध्यक्ष मन्सूर रुईकर यांच्या हस्ते शहराध्यक्षपदी नदीम खादर सय्यद यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये शहनवाज पटेल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी वसीम शेख, निजाम (सरदार)शेख,अनिस जागिरदार, अॅड इम्रान उजलुमवाले, अॅड राजु पटेल, अॅड फैयाज पटेल,आदिची उपस्थिती होती.या निवडीबद्दल त्यांचा सत्कार मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष फहीम शेख, अंकुश कांबळे,राजु कसबे, सरफराज नदीमुल्क, व मुस्लिम विकास परिषदेच्या औसा शहरातील कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या