जयोस्तुते प्रतिष्ठानतर्फे गरजू लोकांना गरम कपडे वाटप

 जयोस्तुते प्रतिष्ठानतर्फे गरजू लोकांना गरम कपडे वाटप




प्रतिनिधी,
लातूर, दि. 2 जानेवारी -
सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी चालू असल्याने थंडीपासून बचाव होवून आरोग्य चांगले रहावे म्हणून वंचित गरजू लोकांसाठी नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर जयोस्तुते प्रतिष्ठानच्या वतीने लातूरमध्ये  प्रतिष्ठानचे अध्यक्ष पप्पूभाई धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामाजिक कार्य हाती घेत गरजू व बेघर लोकांना थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम उबदार कपड्यांचे वाटप पप्पूभाई धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच वाढता कोरोनाकाळ व थंडीच्या तापमानामुळे नागरिकांनी गरजू लोकांना त्यांच्या उपयोगी पडणार्‍या वस्तूंचे वाटप करावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पप्पूभाई धोत्रे यांनी केले.
 यावेळी प्रतिष्ठानचे संजय तापडिया, गोविंद धोत्रे, सचिन अष्टूरे, बाबा धोत्रे, आकाश कोतिबिरे, सुरज धोत्रे, संजू सोनटक्के आदी सदस्य  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या