कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता
किल्लारीतील विशाल बौद्ध-धम्म परीषद पुढे ढकलली
बालाजी उबाळे
औसा-किल्लारी येथे रविवार दि २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली विशाल बौद्ध धम्म परीषद कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे पुढे ढकलन्यात आली असल्याचें श्रद्धा संप्पन्न बौद्ध उपासकांनी रविवारी या कार्यक्रमास येऊ नये असे आवाहन धम्मपरिषदेचे संयोजक पुज्य भन्ते डी. धम्मसार यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकराचे पणतू राजरत्न आंबेडकर साहेब आणि पुज्य भदंत डाॅ.ऊपगुप्त महाथेरो यांच्या आध्यक्षते खाली रविवारी दि 23 रोजी ही विशाल धम्मपरिषद आयोजित केली होती लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात यांचा मोठया प्रमाणात प्रचार प्रसार झाला होता पण सध्या सरकारच्या वतीने लावण्यात आलेले निर्बध आणि नागरिकांचीं होणारी गर्दी लक्षात घेऊन शासन प्रशासनास सहकार्य करावे या हेतूने आणि कार्यक्रमास गालबोट लागू नये म्हणून ही धम्म परिषद पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नंतरची तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा रविवारी कोणीही बौद्ध बांधव या परिषदेसं येऊ नये असे आवाहन संघमित्रा बुध्द विहार किल्लारी चे पुज्य भन्ते धम्मसार यांनी केले आहे.सर्व श्रध्दासंपन्न उपासक व उपासीका,बाल, बालिका,यांनी यांची नोंद घ्यावी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.