आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षपदी
अमित पांडे यांची नियुक्ती
लातूर,दि.१५ः आम आदमी पार्टीच्या लातूर शहर शहाध्यक्षपदी अमित भारत पांडे यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. आप जिल्हा संयोजक प्रताप भोसले यांनी ही नियुक्ती करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित पांडे हे आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून क्रियाशील सभासद, कार्यकर्ता, लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आदी विविध पदांवर कार्य केले असून, आपच्या अनेक आंदोलनात लक्षवेधी सहभागी नोंदविला आहे,त्यांच्या या पक्ष कार्याची दखल घेवून अमित भारत पांडे यांनी लातूर शहराध्यपदी नियुक्ती करण्यात येत आहे,त्यांच्या कार्य व अनुभवाचा पक्षाला चांगला लाभ होईल,असे आप जिल्हा संयोजक प्रताप भोसले यांनी विश्वास व्यक्त करुन अमित पंाडे ंयांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत,तर अमित पांडे यांच्या नियुक्तीबद्दल आदंींनी अभिनंदन केले आहे.अमित पांडे यांच्या लातूर शहराध्यक्षपदी नियुक्तीबद्दल मराठवाड सोशल मिडीया अध्यक्ष हरी गोटेकर,सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष शाम माने, आप महाराष्ट्र युवा अध्यक्ष इंजि.अजिंक्य शिंदे,आप कार्यकर्ते सुमित दीक्षित आदिंनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.