*प्रतिनिधी समीर तांबोळी सांगली*
*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना वाळीत टाकणार्या जातपंचावर गुन्हा दाखल! पलूस येथे जात पंचायत भरवून टाकला होता बहिष्कार!*
https://youtu.be/B-5ECA1QajQ
*अंनिसच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल!*
*आधी संवाद.. आणि मग कायदयाचा बडगा*
नंदीवाले काशी कापडी आणि तीरमल समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या अडीचशे जोडाप्यांच्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे त्या समाजातील बहुसंख्य पंचांनी जाहीर केले असले तरी त्यांमधील काही पंचांनी नुकतीच सांगली जिल्ह्यातील पलूस येथे जातपंचायत भरवून काही जोडप्यांच्या वर बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता , या जोडप्यांनी सातारा अंनिसकडे तक्रार दिली होती. अंनिसने त्याची तातडीने दखल घेऊन त्यांना घेऊन पलूस पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल केला. इस्लामपूर येथील पिडीत प्रकाश भोसले यांनी ६ जातपंचावर फिर्याद दाखल केली.
आज दुपारपासून गुन्हा दाखल करणेची प्रकिया सुरू होती, आज रात्री ९ वाजता पोलीसांनी गुन्हा दाखल केला, यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम साहेब,उपअधीक्षक शेंडगे मॅडम, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळे, हवलदार नितीन गोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सातारा अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, शंकर कणसे, अॅड. हौसेराव धुमाळ, वंदना माने, भगवान रणदिवे मोसीन शेख हे आज दिवसभर पलूस पोलीस स्टेशनला उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्यासाठी मार्गदर्शन/ प्रयत्न करत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.