केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. हासेगाव यांच्याकडून हासेगावात होणार शासकीय दराने तूर खरेदी* सर्व शेतकरी बांधवांनी हमिभावाने खरेदी होणाऱ्या तुरीची ऑनलाईन नाव नोंदणी करावी...

 *केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. हासेगाव यांच्याकडून हासेगावात होणार शासकीय दराने तूर खरेदी* 

सर्व शेतकरी बांधवांनी हमिभावाने खरेदी होणाऱ्या तुरीची ऑनलाईन नाव नोंदणी करावी...



औसा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हमिभावाने खरेदी होणाऱ्या तुरीची ऑनलाईन नाव नोंदणी  केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. हासेगाव येथे सुरू आहे. तरी कंपनीचे चेअरमन श्री. बालाजी बाबूअप्पा बावगे यांनी शेतकऱ्यास लवकरात लवकर ऑनलाईन साठी नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे..

शेतकऱ्यांना हमिभावाने खरीपातील तूर पिकास हमीभाव मिळावा यासाठी *नाफेड व महा एफ पी सी* यांच्या संयुक्त विद्यमाने केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. हासेगाव मार्फत हासेगाव येथे खरेदी सुरू होणार आहे. तरी तूर पिकाचा हमीभाव 6300 रुपये प्रति क्विंटल आहे. शासकीय आधारभूत किमतीने तूर पिकासाठी 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे 1) 7-12, 8-अ, उताऱ्यावर तूर पिकाची नोंद किंवा तलाठी हस्तलिखित तूर पेरा प्रमाणपत्र 2) आधार कार्ड, 3) बँक पासबुक, 4) मोबाईल नंबर घेऊन नोंदणी कार्यालय केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. हासेगाव ता. औसा, जि. लातूर येथे नोंदणीसाठी अर्ज भरून नोंदणी करावी असे आवाहन केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन *श्री. बालाजी बाबूअप्पा बावगे साहेबांकडून* करण्यात आले आहे.. परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी या हमीभावाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी १) संगम बावगे :- 7414957004 व नागनाथ घोडके :- 7756050427 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या