क्षत्रिय राजपूत समाज तर्फे नगर अध्यक्ष Dr अफसर शेख यांचा सत्कर
औसा मुख़्तार मणियार प्रतिनिधी
येथील क्षत्रिय राजपूत समाजाच्या मारवाड़ी स्मशानभूमीच्या कंपाऊंड भिंत तसेच वैकुंठवी हनुमान मंदिर मंगल भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी Dr आफसर शेख यांच्या हस्ते झाले यावेळी क्षत्रिय रजपुत समाज तर्फे नगर अध्यक्ष Drअफसर शेख यांचा सत्कर समाजा च्या वतिने करनयात आला या माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, जावेद शेख, गोविद जाधव, कीर्ती कांबळे, शांताबाई बनसोडे, सय्यद अब्दुल कादर
संजय भंडारी, प्रदीप मोरे, अविनाश • टिके, राजपूत समाजाचे अध्यक्ष संतोष वर्मा उपस्थित होते. डॉ. अफसर शेख म्हणाले, २५ वर्षापासून औसेकरांची माकणी पाणी पुरवठा योजनेसह हद्दवाढ करण्याची मागणी होती. या दोन्ही महत्वाच्या विकासाला माझ्या हातून हातभार लागला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमचे नेते शरद पवार यांनी मला औसाचा विकासासाठी निधीच्या माध्यमातून
आर्थिक बळ दिले. एकीकडे मराठा भवनाचे काम प्रगतीपथावर आहे तर दुसरीकडे उर्दू भवनाचे काम मार्गी लागले. त्याच बरोबर शहरासह ग्रामीण भागातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध करून देताना मला झालेला आनंद हा पुढच्या पिढीसाठी शैक्षणिक व गुणवत्ता वाढीसाठी फलदायी ठरणारा आहे. विकासाची अनेक कामे मार्गी येणाऱ्या काळात १०० कोटींचा विकासनिधी
देण्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त औसेकराना दिला होता. अवघ्या काही दिवसात त्यातील पाच कोटींचा निधीही दादांनी देऊन टाकला.
आमचे नेते शब्द देतात तर ते पाळतात. हे दादांनी करून दाखवले. हे विकासाचे हे चाक अधिक गतिमान करण्यासाठी दादांची साथ माझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या औसेकरांचा आशीर्वाद आपला 'बाबा' म्हणून कायम आहेत. आगामी काळात १०० कोटींचा विकासनिधीतून शहरातील मूलभूत सुविधाचा बॅकलॉग भरून लातूरच्या पुढे औसा हायटेक शहर करण्याचा माझा मानस असल्याचा या वेळी डॉ. अफसर शेख यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक जयराज ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन धर्मेंद्र बिसेनी यांनी केले. कोरोना नियम पाळून अंत्यत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.