केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी हज हाऊस मधील मोफत निवासी प्रशिक्षण पूर्ण क्षमतेने सुरु करा व इतर मागण्या साठी जिलाधिकारी कडे मागणी

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी हज हाऊस मधील मोफत निवासी प्रशिक्षण पूर्ण क्षमतेने सुरु करा व इतर मागण्या साठी जिलाधिकारी कडे निवेदन 




शासकीय सेवेत मुस्लिमांचा टक्का खूप कमी असल्याचं चित्र विविध रिपोर्टमधून समोर आलेले आहे. देशभरातील मुस्लिमांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती देखील खूप बिकट आहे हे देखील ते रिपोर्ट सांगत आहेत. मुस्लिम विध्यार्थ्यांचा शासकीय सेवेत टक्का वाढवणं ही काळाची गरज आहे. मात्र शैक्षणिक मागासलेपण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्या कारणे मोठ्या अडचणी


निर्माण होतात. अश्या परिस्थितीत हज कमिटी ऑफ इंडिया कडून हज हाऊस मुंबई येथे


यूपीएससी साठी सुरू असलेलं मोफत निवासी प्रशिक्षण केंद्र म्हणजे खूप मोठा आधार वाटतो.


आपक-जाय मात्र त्या संस्थेमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या विध्याथ्र्यांना काही अडचणी येत तहसील कार्या असतील आणि त्या सोडवल्या जात नसतील तर सबंधित उमेदरवारां बरोबर समाजाचं देखील मोठं नुकसान होत. याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण ती घ्याल हा विश्वास आहे.


सध्या हज हाऊस येथील यूपीएससी कोचिंग मधील काही सिनिअर विद्यार्थी बाहेर काढल्याची घटना घडली. येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात यूपीएससीची पूर्व परीक्षा आहे. सिनिअर विद्यार्थ्यांना जर आताच बाहेर काढलं गेलं तर येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणी निर्माण होतील.

हज हाऊस मुंबई येथील मोफत निवासी यूपीएससी प्रशिक्षण सुविधा पूर्ण क्षमतेने सुरु करणे गरजेचे आहे. कारण त्यातून जास्तीत जास्त मुलां-मुलींना संधी मिळतील आणि त्याचा फायदा त्यांना अभ्यासात होईल. परीणाम यूपीएससी मध्ये मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढवण्यास मदत होईल.


महाराष्ट्रातील मुस्लिम विध्यार्थ्यांसाठी हज हाऊस येथील प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रात अभ्यास करण्यासाठी सुविधा पुरवणारी एकमेव संस्था आहे. म्हणून ती संस्था पूर्ण क्षमतेने सुरू करणे गरजेचे आहे. विशेष करून मुस्लिम मुलींचा हज हाऊसच्या निवासी प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रत्येक वर्षीच्या प्रवेशामध्ये मुस्लिम मुलींसाठी काही जागा आरक्षित करणे देखील गरजेचे आहे.


हज हाऊस मधील निवासी यूपीएससी प्रशिक्षण केंद्राततील सर्व सुविधा त्यांना व्यवस्थित व वेळेवर पुरवणे. विध्यार्थ्यांना मेस साठी मिळणार सबसिडी पुन्हा सुरू करणे गरजेचं आहे कारण याचा थेट फायदा गरीब विध्यार्थ्यांना होतो. महाराष्ट्रातील नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी हज हाऊस च्या अस्तित्वात असलेल्या इमारातींमध्ये यूपीएससी आणि एमपीएससीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण व ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरु करणे गरजेचं आहे. कारण यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागातील विध्यार्थ्यांना याचा फायदा होईल. गरीब व होतकरू विध्यार्थी यूपीएससी, एमपीएससी साठी प्रयत्न करू लागतील.


सर्वच शासकीय सेवांमध्ये मुस्लिम मुला-मुलीचं प्रमाण वाढलं पाहिजे यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे.


वरील सर्वच गोष्टी ह्या महत्वाच्या असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत, प्रमुख मागण्या 


१. हज हाऊस मोफत निवासी यूपीएससी प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेने म्हणजे संपूर्ण २०० जागा भरण्यात याव्यात. २. मुस्लिम मुलींसाठी हज हाऊस येथील यूपीएससीच्या निवासी प्रशिक्षण केंद्रात ५० जागा ह्या मुलींसाठी आरक्षित ठेवण्यात याव्यात.

३. महाराष्ट्रातील नागपूर आणि औरंगाबाद येथे मुंबई हज हाऊसच्या धर्तीवर मोफत यूपीएससी,एमपीएससी प्रशिक्षण केंद्र सर्व सोयीसुविधायुक्त उभारण्यात यावे.


४. ज्या विध्यार्थ्यांनी २०२१ ची मुख्य परीक्षा दिली आहे त्यांना चालू शैक्षणिक वर्षात हज हाऊसमध्येच ठेवण्यात यावे, ज्या सिनिअर विध्यार्थ्यांना बाहेर काढलं गेलं आहे त्यातील होतकरू विध्यार्थ्यांना हज हाऊसमध्ये ठेवण्यात यावे.


५. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यांना पूर्वाश्रमीची मेस सबसिडी १५००/महिना देण्यात देण्यात यावी.

अशी मागणी सकल मुस्लिम युवक  महाराष्ट्र मराठी मुस्लमान यांच्या आव्हान ला औसा येथील युवक यांनी केली या निवेदन वर शेख सोहेल

पठाण सुलेमान सद्दाम अलमेलकर , अली कुरेशी   ज़र्दी रियाजोद्दीन आदि चे स्वाक्षरी आहेत 

महित्सव 

मा.श्री. मुख्तार अब्बास नकवी साहेब (केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री, भारत सरकार)


मा.श्री. नवाब मलिक साहेब (अल्पसंख्याक मंत्री, महाराष्ट्र शासन)


मा. श्री. धनंजय मुंढे साहेब


(सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र शासन)


मा.श्री. चेअरमन साहेब, (हज कमिटी ऑफ इंडिया)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या